Pune Traffic Update News | पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलीस अधिकारी, 2 किमीच्या अंतरासाठी लागला दीड तास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Update News | पुण्यात वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत असताना पुण्यातील या वाहतूक कोंडीत खुद्द पोलीस अधिकारीच (Police Officer) अडकल्याचे पहायला मिळाले. वाहतूक कोंडीत अडकल्याने या पोलीस अधिकाऱ्यांचा चांगलाच पारा चढला. अभिमान श्री सोसायटी (Abhimana Shree Society) ते पुणे विद्यापीठ रस्त्यावर (Pune University Road) बुधवारी प्रचंड वाहतूक कोंडी (Pune Traffic Update News) झाली होती. दोन किलोमीटरसाठी पोलीस अधिकाऱ्यांना तब्बल दीड तासांचा वेळ लागला. मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

कॉसमॉस जंक्शन (Cosmos Junction) या ठिकाणी मेट्रोचे (Pune Metro) कामकाज सुरु आहे. त्यामुळे पुणे मेट्रोकडून याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी (Pune Traffic Update News) फोडण्यासाठी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात एक बैठक झाली होती. या बैठकिला पोलीस आयुक्त, महापालिका, मेट्रो आणि आरटीओ व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुण्यात ज्या 15 मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. ती वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याने यातून कधी सुटका होणार असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

 

वाहतूक पोलीस वाहने उचलण्यात मग्न
शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना दुसरीकडे वाहतूक पोलीस (Traffic Police) वाहने उचलण्यावर आणि नागरिकांना दंड ठोठावण्यात मग्न आहेत. पुण्यातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत असताना त्याठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नाहीत किंवा ट्रॅफिक वॉर्डन दिसत नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलीस असले तरी त्याठिकाणी वाहतूक कोंडी सुटलेली दिसत नाही. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा प्रत्यय बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना आला.

2 किमीसाठी दीड तास
बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) आणि पोलीस ठाण्यात जाण्यासाठी काही अधिकारी औंध परिसरातून निघाले. मात्र अभिमान श्री सोसायटी ते पुणे विद्यापीठ या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधिकारी देखील वाहतुक कोंडीत अडकले. या अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठापर्यंत येण्यासाठी तब्बल दीड तास लागला. याठिकाणी वाहतूक कोंडी झाली असताना मात्र वाहतूक पोलीस कुठेच दिसले नाहीत. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे तिथे पोलीस नसतात, मात्र जिथे आवश्यकता नाही तिथे वाहतूक पोलीस असतात असे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.

 

पोलिसांनी फोडले मेट्रोवर खापर
कॉसमॉस जंक्शन येथे मेट्रोचे काम सुरु असून त्याठिकाणी मेट्रोकडून रात्री बॅरिकेट्स वाढवण्यात आले होते. मेट्रोने देखील वाहतूक सुरळीत चालेल का हे बघण्यासाठी हे बॅरिकेट्स टाकले होते. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मेट्रोकडून याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली नसल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीचे खापर मेट्रोवर फोडले. दरम्यान, पोलिसांनी बॅरिकेट्स काढून वाहतूक सुरळीत केली. अर्धा ते पाऊन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

पोलिसांच्या सूचनांकडे मेट्रोचे दुर्लक्ष
वाहतूक विभागाने पुणे मेट्रोला हे बॅरिकेट्स वाढवण्यापूर्वी सेनापती बापट रोडवरील (Senapati Bapat Road)
जंक्शन सुरु केल्यानंतर हे काम करण्यास सांगितले होते.
मात्र, तसे न करता मेट्रोने हे जंक्शन सुरु करण्यापूर्वीच बॅरिकेट्स टाकले होते. ते काढण्यात आले आहेत.
या ठिकाणी सिग्नल बसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर या जंक्शनवर मेट्रोचे कामकाज सुरु करण्याचे नियोजन आहे.
जेणे करुन या मार्गावरुन वाहतूक वळविण्यात येईल,
असे चतु:शृंगी वाहतूक विभागाचे (Chatu: Shringi Traffic Department)
पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी (Police Inspector Babasaheb Koli) यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Traffic Update News | The police officer himself got stuck in the traffic jam of Pune, it took an hour and a half to cover a distance of 2 km

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी