Pune Traffic Updates | मेट्रो स्थानकातील पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल

पवळे चौक ते कमला नेहरू रुग्णालय रस्ता वाहतुकीस बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | कसबा पेठेतील मेट्रो स्थानकाच्या (Kasba Peth Metro Station) परिसरातील पादचारी भुयारी मार्गाचे (Pedestrian Subway) काम सुरु केले आहे. यामुळे कसबा पेठेतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पवळे चौकातून (Pavle Chowk) कमला नेहरू रुग्णलयाकडे (Kamala Nehru Hospital) जाणारा रस्ता केवळ दुचाकी वाहनांना सुरु राहणार असून हा मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद असणार आहे. कमला नेहरू रुग्णालयाकडे जाणाऱ्या तीन चाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांनी (Pune Traffic Updates) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) केले आहे.

 

कसबा पेठेतील साततोटी चौकात मेट्रो स्थानक (बुधवार पेठ मेट्रो स्थानक) आहे. बुधवार पेठ मेट्रो स्थानक भुयारी आहे. साततोटी चौकातून मेट्रो स्थानकापर्यंत पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पवळे चौकातून मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाकडे जाणाऱ्या तीन चाकी, चार चाकी, अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Traffic Branch DCP Vijayakumar Magar) यांनी केले आहे. (Pune Traffic Updates)

 

पवळे चौकातून कमला नेहरू रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पवळे चौकातून पुण्येश्वर रस्त्याने कुंभारवेस चौकाकडे जावे. तेथून कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय, कागदीपुरा या मार्गाने कमला नेहरू रुग्णालयाकडे जावे. पवळे चौकातून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनाचालकांनी कसबा पेठ पोलीस चौकीजवळील (Kasba Peth Police Chowki) रस्त्याने माणिक चौक, फडके हौद चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.

कमला नेहरू रुग्णालयाकडून कसबा पेठेतील पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कमला नेहरू रुग्णालय
जवळून वळावे. महाराणा प्रताप रस्ता, देवजीबाबा चौक, गणेश रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
कमला नेहरू रुग्णालयाकडून कागदीपुरा, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय मार्गे वाहनचालकांनी कुंभार वेस चौकातून इच्छित स्थळी जावे.

 

Web Title : Pune Traffic Updates | Change in traffic in Kasba Peth due to work on footpath at metro station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा