Stree 2 Teaser Out | ‘ओ स्त्री रक्षा करना’; स्त्री 2 चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Stree 2 Teaser Out | बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या स्त्री चित्रपटाचा सिक्विल स्त्री 2 चा टीझर राजकुमार रावने पोस्ट केला आहे. स्त्री 2 च्या टीझरला (Stree 2 Teaser Out) प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

2018 साली प्रदर्शित झालेल्या स्त्री (Stree Movie) चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील भयावह कथा आणि सस्पेंस यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील कास्ट अर्थात श्रद्धा कपूर व राजकुमार राव (Shraddha And Rajkumar) ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘स्त्री 2’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. ‘स्त्री 2’ मध्येही हेच कलाकार भूमिका साकारणार आहेत. अभिनेता राजकुमार राव याने ‘स्त्री 2’ चा टीझर रिलीज केला आहे.

‘स्त्री 2’ च्या टीझरमध्ये ही चंदेरी हेच गाव दाखवण्यात आले आहे. स्त्री चित्रपटामध्ये ‘ओ स्त्री कल आना’ हे वाक्य खूप महत्त्वाचे ठरले होते. त्याचप्रमाणे स्त्री 2 मध्ये ‘ओ स्त्री रक्षा करना’ हे वाक्य महत्त्वपूर्ण असणार आहे. तसे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच यामध्ये एक सावली मानवाचे मुंडके हातात घेऊन उभी आहे असे दाखवण्यात आले आहे. ‘स्त्री 2’ चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आता टीझर आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. मात्र आत्ता फक्त चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे.

श्रद्धा कपूर व राजकुमार राव यांचा ‘स्त्री 2’ चित्रपट पुढच्या वर्षी 2024 ला प्रदर्शित होणार आहे.
( Stree 2 Release Date) आता मध्य प्रदेशमधील (MP) चंदेरी गावामध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.
(Stree 2 Teaser Out ) काही दिवसांपूर्वी श्रद्धा मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) शुटिंगसाठी जाताना दिसली होती.
तसेच तिने इंस्टाग्रामवर देखील चंदेरीला जात असल्याची स्टोरी टाकली होती.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट
(Tu Jhuti Main Makkar) प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता.

Web Title :  Stree 2 Teaser Out | stree 2 teaser out rajkummar rao shraddha kapoor horror film release on august 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)