Pune Traffic Updates | नाताळानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | नाताळ सणानिमित्त (Christmas) लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत रविवारी (दि. 24 डिसेंबर) सायंकाळी सातनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. लष्कर भागातील महात्मा गांधी रोड Mahatma Gandhi Road (मेन स्ट्रीट) व परिसरात नाताळ सणानिमित्त मोठी गर्दी होते. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर सोमवारी (दि.25) रात्री गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस (Pune Traffic Police) उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी कळविले आहे. (Pune Traffic Updates)

वाहतुकीमधील बदल खालील प्रमाणे

  • रविवारी (दि.24) सायंकाळी सातनंतर वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी रस्त्यावरील 15 ऑगस्ट चौकातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. कुरेशी मशिद, सुजाता मस्तानी चौकातून वाहतूक वळविण्यात येणार आहे. (Pune Traffic Updates)
  • इस्कॉन मंदिर चौकातून (ISKCON Mandir Chowk) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक एस.बी.आय. हाऊस- तीन तोफा चौकातून वळविण्यात येणार आहे.
  • व्होल्गा चौकातून मोहंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
    या भागातील वाहतूक इस्ट स्ट्रीटमार्गे स्व. इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
  • स्व. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
    या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे (Lashkar Police Station) वळविण्यात येणार आहे.
    सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून,
    या भागातील वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे वळविण्यात येणार आहे.

वाहन चालकांनी पर्य़ायी मार्गाचा वापर करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा गजाआड, जाणून घ्या हल्ल्याचे कारण

लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात