Pune Traffic Updates News | शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates News | तिथीप्रमाणे शुक्रवारी (दि.10) छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) आहे. यानिमित्त विविध संघटनांकडून मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. या मिरवणूकी दरम्यान वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक विभागाकडून (Pune Traffic Updates News) वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच, शहराच्या विविध भागांतूनही मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसभरात आवश्यकतेनुसार मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करुन वाहतूक पोलिसांना (Pune Traffic Police) सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी केले आहे.

मुख्य मिरवणुकीचा मार्ग

शिवजयंतीची मुख्य मिरवणूक (Main Procession) भवानी माता मंदिर, रामोशी गेट चौक, नेहरू रस्त्याने ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौकातून नानाचावडी चौकी, अरुणा चौक, नाना पेठ चौकी, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशिद चौक, सोन्या मारुती चोक, फडके हौद चौकातून लाल महालापर्यंत जाणार आहे. तेथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. (Pune Traffic Updates News)

मुख्य मिरवणूक मार्ग डायव्हर्शन

1. नेहरु रोड वरील वाहतूक बंद केल्यानंतर पॉवर हाऊस कडून सेव्हन लव्हज कडे जाणाऱ्यांनी कादर चौक-क्वार्टर गेट चौक, जुना मोटार स्टॅन्ड मार्गे जावे अथवा पॉवर हाऊस ते समर्थ पोलीस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करावा. तसेच सेव्हन लव्हज चौकाकडून पॉवर हाऊस क़े जाणाऱ्यांनी बाहुबली चौक राजसबाई गंगाळे पथ मार्गे जुना मोटार स्टँड मार्गे जावे

2. लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्यांनी नेहरू रोड-पॉवर हाऊस चौक- अपोलो टॉकीज-फडके हौद-जिजामाता चौक मार्गे जावे. तसेच देवजी बाबा चौकाकडून मिठगंज चौक मार्गे स्वारगेट कडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक ते दारुवाला पूल ते अपोलो सिनेमा ते पॉवर हाऊस चौकातून नेहरु रोडचा वापर करावा

3. गणेश रोडवरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजीरोड मार्गे गाडगीळ पुतळा, बुधवार चौक मार्गे इच्छितस्थळी जाईल. मिरवणुक मोती चौक, फडके हौद चौक पाक होईपर्यंत केळकर रोडने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर मार्गे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार आप्पा बळवंत चौक बुधवार चौकातुन वळून बाजीराव रोडने, शिवाजी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

4. शिवाजी रोडवरुन स्वारगेटला जाणारे वाहनचालकांनी स.गो.बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. तसेच स.गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

मिरवणूकच्या मार्गावर दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास बंदी आहेत. तसेच लहान रस्त्यांवर व
गल्ली बोळात मुख्य रस्त्याचे तोंडापासून 100 फूट अंतरापर्यंत वाहने उभी करण्यास बंदी आहे.
मुख्य निवडणुकी व्यतिरिक्त शहरात लष्कर, खडकी भागात तसेच इतर भागात लहान मोठ्या मिरवणूका निघणार आहेत.

लष्कर भागातील मिरवणूक

मिरवणूक मार्ग – खान्या मारुती चौक येथून सुरु होईन ट्रायलक हॉटेल चौक, न्यु मोदीखाना मार्गे मुफ्ती
चौकातून उजवीकडे वळून कुरेशी मशिद, सेंट्रल स्ट्रीटने भोपळे चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी, आसुडखाना चौक
येथे मिरवणुकीचे विसर्जन होईल.

खडकी भागातील मिरवणूक

मिरवणूक मार्ग – शिवाजी पुतळा खडकी बाजार येथून सुरु होऊन कॅन्टोमेंट हॉस्पील चौक, श्रीराम मंदीर,
आसुरखाना चौक, हुले रोडने नवी तालिम चौक, गोपी चौक, आंबेडकर चौक टिकारा चौक,
डी.आर. गांधी चौकातून शिवाजी पुतळा येथे विसर्जीत होईल.

Web Title : Pune Traffic Updates News | Traffic changes in Pune on the occasion of Shiv Jayanti, know alternative routes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे