Pune Traffic Updates | फर्ग्युसन रस्त्यावरून खडकी, बोपोडी, औंधकडे जाणार्‍या दुचाकी, चारचाकींना ‘कृषी महाविद्यालयाचा’ अंतर्गत रस्ता लवकरच खुला होणार

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री अजित पवारांच्या प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे गणेशखिंड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने मेट्रोचे काम होईपर्यंत म्हसोबा गेट येथून सिंचननगर कडे व तेथून औंधकडे जाण्यासाठी कृषी महाविद्यालयातील अंतर्गत रस्ता दुचाकी आणि हलक्या चारचाकींसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज येथील कामाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर कृषी महाविद्यालयाला अंतर्गत रस्ता खुला करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनीही याला तत्वत: मान्यता दिल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गणेशखिंड रस्त्यावरील मेट्रोच्या कामाची पाहाणी केली. यावेळी आमदार शिरोळे यांच्यासह महापालिका, पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकार्‍यांसोबतच्या बैठकीमध्ये सकाळी ७ ते रात्री १०.३० वाजेदरम्यान वाहतुकीचा ताण असताना म्हसोबा गेट येथून सिंचननगर कडे जाणारा महाविद्यालयातील अंतर्गत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी तातडीने याचा अहवाल तयार करावा. त्यानुसार परवानगी देण्यात येईल, असे महाविद्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

कृषी महाविद्यालय अंतर्गत रस्ता खुला झाल्यास डेक्कन, फर्ग्युसन रस्त्यावरून कृषी महाविद्यालयाच्या आवारातून भोसलेनगर, खडकी, बोपोडी आणि औंधकडे जाणार्‍या दुचाकी व चार चाकी वाहनांची सोय होउन गणेशखिंड रस्त्यावरील कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास आमदार शिरोळे यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wakad Crime | कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याने दोन कुटुंबात हाणामारी, वाकड परिसरातील घटना