Pune Trains | पुणे-जयपूर विशेष द्विसाप्ताहिक अतिजलद ट्रेनला मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Trains | रेल्वेने पुणे – जयपूर विशेष द्वि-साप्ताहिक अतिजलद ट्रेनच्या सेवा विशेष शुल्कासह वाढवण्याचा निर्णय (Pune Trains) घेतला आहे. तपशील खाली दिलेल्यानुसार:

02939 विशेष (बुधवार आणि रविवार) दि. ३.१०.२०२१ ते २९.६.२०२२ पर्यंत चालविण्यात येईल.

02940 विशेष (मंगळवार आणि शनिवार) दि. २.१०.२०२१ ते २८.६.२०२२ पर्यंत चालविण्यात येईल.

वरील गाड्यांच्या वाढीव फेऱ्या विद्यमान संरचना, वेळ आणि मार्ग इत्यादींवर चालतील.

आरक्षण: विशेष शुल्कासह 02939 विशेष ट्रेनच्या विस्तारित फे-यांचे बुकिंग दि. १८.९.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

वरील अतिजलद विशेष ट्रेनच्या (Pune Trains) थांब्यांच्या तपशीलवार वेळांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष अतिजलद ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड १९ शी संबंधित एसओपीचे, सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

हे देखील वाचा

Raosaheb Danve | युती झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी चालतील का?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

FIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Trains | Pune Jaipur special bi weekly high speed train extended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update