Pune University (SPPU News) | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समारंभाची पाली व बौद्ध अध्ययन विभागामध्ये दिमाखदार सुरुवात

पुणे : Pune University (SPPU News) | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९६ व्या (Mahatma Jyotiba Phule Jayanti) व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) या महामानवांना अभिवादन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे (Department of Pali and Buddhist Studies) संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती सोहळ्याची सुरुवात दि. ९ एप्रिल रोजी पाली व बौद्ध अध्ययनाचे ज्येष्ठ विद्वान महापंडित राहुल सांकृत्यायन (Rahul Sankrityayan) यांच्या १३० व्या जयंतीदिनी प्रा. तृप्तीराणी तायडे यांच्या सहयोगाने आयोजित चौदा तासांच्या अभ्यासिकेच्या उपक्रमाने झाली. यात विभागातील व विभागाबाहेरील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाग घेतला. सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत विभागात चाललेल्या या अभ्यासिकेत केवळ भारतीयच नव्हे तर व्हिएतनाम, तैवान व कोरिया (Vietnam, Taiwan and Korea) देशातील विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. (Pune University (SPPU News)

दि. १० एप्रिल रोजी प्रा. रीतेश ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. दि. १२ एप्रिल रोजी प्रा. प्रणाली वायंगणकर व प्रा. दीपाली पाटील यांच्या नेतृत्वात विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी डॉ. महात्मा फुल्यांच्या विचारांचा बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांवरील प्रभाव, सद्यस्थितीतील फुले आंबेडकर चळवळीपुढील आव्हाने, आणि फुले-आंबेडकरी विचार समाजातील सर्व स्तरात पोहोचविण्यासाठी काय करता येईल? या विषयांवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये आपले विचार मांडले.

काव्यवाचन स्पर्धेत महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी संबंधित विविध विषयांवर मराठी व हिंदी कविता सादर झाल्या. विभागातील एम.ए. चे विद्यार्थी शाक्यविभोर मौर्य व प्रज्वला भिंगारे यांनी अनुक्रमे या स्पर्धांचे सूत्रसंचालन केले. प्रा. महेश देवकर आणि कवी अतुल गुलालकर यांनी स्पर्धांचे परीक्षण केले. याच दिवशी प्रा. दीपक गायकवाड यांच्या सहयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाली व बौद्ध अध्ययनाला योगदान, महात्मा ज्योतीबा फुले यांचे बौद्ध विचारांशी नाते, आणि फुले-आंबेडकर चळवळीची सद्यस्थिती या विषयांवर निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप गोखले यांनी काम पाहिले. (Pune University (SPPU News)

दि. १४ एप्रिल रोजी विभागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी दरवर्षी प्रमाणे पिंपरी
व पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळा तसेच दापोडी येथील धम्मचक्र प्रवर्तन महाविहार येथे पाली व बौद्ध अध्ययन
जागरुकता अभियान राबविले. या अभियानाचे नियोजन प्रा. तलत प्रवीण यांनी केले. सर्वसामान्य लोकांना या
विषयांची माहिती देण्यासाठी पत्रके वाटण्यात आली व अभ्यासक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
पिंपरीचे विद्यमान आमदार श्री. आण्णासाहेब बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार,
विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. वासुदेव गाडे तसेच अमेरिकेतील स्कूल ऑफ हेल्थ ॲन्ड ह्यूमन सायन्सेन मधील
प्रा. जेरेमी रिंकर यांनी या अभियानाला आवर्जून भेट दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीप्रसंगी पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाली भवन’
या प्रस्तावित नवीन इमारतीसाठीच्या बहुप्रतिक्षित करारनाम्यावर देखील सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त श्री. बाळासाहेब सोळंकी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे
कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे या नवीन इमारतीच्या उभारणीच्या कामाचा मार्ग
आता मोकळा झाला आहे.

या संयुक्त जयंती सोहळ्याची सांगता दिनांक १७ एप्रिल रोजी पुणे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सांस्कृतिक भवनामध्ये सायंकाळी ४ ते ८.३० या वेळेत होणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (Hari Narke)
यांच्या विशेष व्याख्यानाने होणार आहे. याच कार्यक्रमात सुरवातीला विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम
होतील व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रा. हरी नरके
यांच्या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title :-  Pune University (SPPU News) | Savitribai Phule Pune University: Mahatma Jyotiba Phule and Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar’s joint birth anniversary celebration in the Department of Pali and Buddhist Studies began on a grand scale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Borghat Accident News | बोरघाटात बस दरीत कोसळली ! खोपोलीतील घटनेत 8 जणांचा मृत्यु, 32 जण जखमी

Radhakrishna Vikhe-Patil | ‘आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये’, विखे-पाटलांच्या टीकेला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

Pune Crime News | २४ वर्षाच्या मुलावर लादली अवास्तव बंधने; आईवडिलांना सांगण्याच्या धमकीने लुबाडले अडीच लाख