Pune Uttam Nagar Crime | पुणे : भररस्त्यात व्यावसायिकाला लुटणाऱ्या स्वयंघोषित दोन भाईंना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Uttam Nagar Crime | धंदा करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल असे म्हणत व्यावसायिकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले (Robbery Case). तसेच मदतीसाठी आलेल्या लोकांना शिवीगाळ करुन आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हवेत हत्यारे फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या दोन स्वयंघोषित भाईंना उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.17) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अचानक चौकातील आर.आर. वाईन्स समोरील सार्वजनिक रोडवर घडली.

याबाबत परेश ईश्वरदास भागचंदानी (वय-42 रा. प्रथमेश हाईट्स, उत्तमनगर, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिनेश वांजळे, भुपेंद्र शिंदे, सचिन मारणे यांच्यावर आयपीसी 392, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन भुपेंद्र व सचिन यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरुन अचानक चौकातून जात होते.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आडवले. इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, तु हप्ता का दिला
नाही अशी विचारणा करुन फिर्य़ादी यांची गचांडी पकडली. आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराचा धाक
दाखवून फिर्य़ादी यांच्या खिशातून जबरदस्तीने 4200 रुपये काढून घेतले.

परेश यांनी आरडाओरडा केला असता रस्त्यावरुन जाणारे लोक त्यांच्या मदतीसाठी आले.
त्यावेळी आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कुणी हप्ता दिला नाही तर एकेकाला बघुन
घेऊ असे मोठ मोठ्या ओरडून लोकांना शिवीगाळ केली. तसेच परिसरात दहशत पसरवून दुचाकीवरुन पळून गेले.
घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका