Pune Vadgaon Sheri Crime | पुणे : व्याजासाठी तगादा, बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; सावकारावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Vadgaon Sheri Crime | बांधकाम व्यवसायासाठी व्याजाने घेतलेल्या पैशांची काही प्रमाणात परतफेड केली. परंतु, सावकाराने चक्रवाढ व्याज लावून पैशाची वारंवार मागणी करून धमकी दिल्याने बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरात मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावकारावर चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (FIR On Money Lender)

शशिकांत दत्तात्रेय कातोरे (वय-41 रा. गार्डिनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. तर विनय विष्णुपंत काळे (वय-38 रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी) याच्यावर आयपीसी 306, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तात्रय साहेबराव कातोरे (वय-69 रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Builder Suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शशिकांत यांचा सद्गगुरू इन्फ्रा या नावाने बांधकाम कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. या कामासाठी ते बँक लोन घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला बँक लोन घेऊ नका, मी तुम्हाला पैसे देतो त्यावर मला पाच टक्क्यांप्रमाणे परतावा द्या असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीकडून पैसे घेतले. मयत शशिकांत कातोरे यांनी आरोपीला ठरल्या प्रमाणे पाच टक्क्या प्रमाणे वेळोवेळी रोख व ऑनलाईन पैसे दिले.

मागील काही महिन्यापूर्वी नवीन साईट सुरु करण्यासाठी फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीकडून पाच टक्के प्रमाणे पैसे घेतले.
मात्र, ही साईट सुरु झाली नसल्याने आरोपीने रक्कमेवर चक्रवाढ व्याज लावून शशिकांत यांच्याकडे पैशांची मागणी केली.
तसेच घरी जाऊन पेसे दिले नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची धमकी फिर्यादी यांना दिली.
यानंतर पुन्हा फोन करुन ‘तु माझ्या पैशांचे काय करणार आहे, तुला माहित आहे ना मी कसा आहे.
तु जर पैसे दिले नाहीतर तु समजून जा’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाकडे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला.
आरोपीचा त्रास सहन न झाल्याने शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली.
आरोपीने मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दत्तात्रय कातोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prabha Atre Passed Away | पद्मविभूषण स्वयमयी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Lashkar Crime News | पत्रकार असल्याचे सांगुन महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात पैशाची मागणी! भुषण साळवे, संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

Pune Police Inspector Transfer News | पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश