Pune Vaikunth Smashan Bhumi | आधुनिक उपाययोजनांमुळे वैकुंठ स्मशानभूमीतील प्रदूषण कमी झाले, राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Vaikunth Smashan Bhumi | वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) अधुनिक उपाययोजना केल्या आहेत. यामुळे होणारे प्रदूषण (Pollution) मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. तक्रारदार नागरिकांची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (Maharashtra Pollution Control Corporation) ही माहिती दिली आहे. (Pune Vaikunth Smashan Bhumi)

वैकुंठ स्मशानभूमीमुळे (Pune Vaikunth Smashan Bhumi) परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्मशानभूमी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येतात. या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. परंतु यानंतरही तक्रारी येतात. या पार्श्‍वभूमीवर नुकतेच राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar), विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि तक्रारदार नागरिकांची नुकतेच ऑनलाईन बैठक झाली.

या बैठकीमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विद्यानंद मोटघरे यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले. स्क्रबरही बसविले आहेत. पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार्‍या शेडस्मध्येही अशीच यंत्रणा आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी याठिकाणी प्रत्यक्ष भेट आणि तांत्रिकही तपासणी केली. यामध्ये आधुनिक यंत्रणेमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे आढळून आल्याचे बैठकीत सांगितले.

तसेच प्रदूषणासाठी केवळ स्मशानभूमीमधून निघणार्‍या धूरासोबतच रस्त्यावरील वाहनांचा धूर बांधकामाची धूळ हे
घटकही तितकेच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आणून देत महापालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
पारंपारीक लाकडावरील अंत्यसंस्काराचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नात आहे.
यामुळे प्रदुषण आणखी कमी होण्यास मदत होईल. सध्या या स्मशानभूमीमध्ये दररोज होणार्‍या अंत्यसंस्कारापैकी
६० ते ७० टक्के अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीमध्ये होत असल्याची माहिती कंदुल यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | माजलगावात आंदोलनाला हिंसक वळण, राष्ट्रवादी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ, न.पा. कार्यालय जाळले

Maratha Reservation | देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा