Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Vidyapeeth Crime | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर (WhatsApp Group) टाकलेली राजकीय पोस्ट (Political Post)डिलीट केल्याच्या रागातून सात आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील (SPPU News) आदर्श कॅन्टीन येथे घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीसांनी (Chaturshringi Police Station) आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिल भिमराव फुंदे (वय-28 रा. जुनी सांगवी, पिंपरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राम तरपडे, करुण वाकोडे, वैभव दिघे, गणेश काकडे व त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी तरुणांवर आयपीसी 324, 323, 504, 506, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्य महितीनुसार, फिर्य़ादी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. आरोपीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट फिर्य़ादी यांनी डिलीट केली. याचा राग आल्याने आरोपींनी अनिल यांना फोनकरुन बोलावून घेतले. आरोपींनी पोस्ट डिलीट केल्याच्या रागातून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्लास्टिकची खुर्ची डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव करीत आहेत.

अश्लील हातवारे करुन नाचल्याने पाईपने मारहाण

कोंढवा (Kondhwa): अश्लील हातवारे करुन नाचत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीत विट
मारुन डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले.
हा प्रकार 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास कोंढवा बुद्रुक भागातील लक्ष्मीनगर येथील गल्ली नंबर आठ
येथील सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी निखील मनोज भिंगारदिवे (वय-30 रा. कोंढवा बुद्रुक) यांनी शुक्रवारी (दि.22)
कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

यावरुन धिरज अशोक साळवे, चैतन्य धनवडे, सुमित बाळु साळवे, विवेक अनिल पाटोळे, ऋतिक अशोक साळवे व इतरांवर आयपीसी 324, 336, 323, 504, 141, 143, 147, 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik City Police | नाशिक : गोवंश मासाची वाहतुक विक्री करणाऱ्या 8 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई (Video)

Shivsena UBT On Modi Govt | …तर केजरीवाल अजित पवारांसारखे भाजपाचे नवे शंकराचार्य झाले असते, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी सरकारवर घणाघात

Pune Crime News | पुणे : भांडण सोडवणं बेतलं जीवावर, मारहाणीत 57 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू