Pune Viman Nagar Crime | हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Viman Nagar Crime | कारचा हॉर्न वाजवला म्हणून सहा जणांनी बेदम मारहाण केली. तसेच कारच्या डिग्गीवर दगड मारुन नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि.26) रात्री अकराच्या सुमारास विमाननगर परिसरातील दत्त मंदिर चौकातील (Datta Mandir Viman Nagar) एचडीएफसी बँकेसमोर (HDFC Bank Viman Nagar) घडली.

मझहर शेख व त्याच्या पाच साथीदारांवर आयपीसी 323, 324, 143, 146, 147, 149, 427, 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहानवाज शकिल अन्सारी (वय-33 रा. इंद्रमणी सोसायटी, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) बुधवारी (दि.27) फिर्याद दिली आहे.(Pune Viman Nagar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसोबत कामधून जात होते. दत्त मंदिर चौकातील एचडीएफसी बँकेसमोर फिर्यादी यांच्या कार समोरील दुचाकीस्वाराला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला. हॉर्न वाजवल्याच्या रागातून आरोपीने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. सर्वांनी फिर्य़ादी व त्यांच्या मैत्रिणीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आरोपी पैकी एकाने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.
तसेच कारच्या डिग्गीवर दगड मारुन नुकसान केले.
फिर्यादी यांनी स्कूटरच्या गाडी क्रमांकावरुन आरोपीची माहिती घेतली असता त्याचे नाव मजहर शेख असल्याचे समजले.
त्यानुसार फिर्यादी यांनी मजहर शेख व त्याच्या पाच साथीदांविरुद्ध तक्रार केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे

Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शरद पवार गटाची अजित पवारांवर खोचक टीका, ”…तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही, धाकदपट’शहां’ची…” (Video)

Rohit Pawar On Sunil Tatkare | रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, अजित पवारांची साथ सोडणारे ते पहिले व्यक्ती असतील

Bacchu Kadu On Navneet Rana | ”नवनीत राणांचा पराभव करणार”, उमेदवारी दिल्याने बच्चू कडू भाजपावर संतापले