Pune Warje Malwadi Police | झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्याकडून हॉस्टेलमधील मुलांच्या लॅपटॉपची चोरी ; वारजे पोलिसांकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Warje Malwadi Police | पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणाने झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं (Zomato Delivery Boy) काम सुरु केले. मात्र, डिलिव्हरी करताना हॉस्टेलमधील मुलांचे लॅपटॉप चोरी करण्यास सुरुवात केली (Theft Case). वारजे माळवाडी पोलिसांनी वसतीगृहातील मुलांचे लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक करुन 4 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.(Pune Warje Malwadi Police)

तेजस दत्तात्रय सुर्यवंशी (वय-23 रा. मगनपुरा, नवामोंढा, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत असताना आरोपी तेजस याला ताब्यात घेतले. तेजस एक वर्षांपूर्वी पुण्यात डिएमएलटी शिक्षण घेण्यासाठी आला. शिक्षण घेत असताना त्याने झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्यास सुरुवात केली.

डिलेव्हरीचे काम करताना कोणत्या ठिकाणी मुलांचे हॉस्टेल आहेत, मुले कधी बाहेर बाहेर जातात, कधी रुमवर परत येतात याची माहिती मिळवली. त्यानंतर त्याने संधी साधून हॉस्टेलवर जाऊन तेथे राहणाऱ्या मुलांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करण्यास सुरुवात केली. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास करुन 9 लॅपटॉप, 3 मोबाईल, 1 दुचाकी असा एकूण 4 लाख 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी तेजस याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन लॅपटॉप, तीन मोबाईल, एक स्मार्टवॉच चोरले.
तसेच अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन लॅपटॉप, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लॅपटॉप चोरले.
तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त प्रविण पवार
(IPS Pravin Pawar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे
(ACP Bhimrao Tele) यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे (PI Manoj Shedge),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगातप (PI Nilkanth Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते (API Ranjit Mohite), पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve), पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, बंटी मोरे, मनोज पवार, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अजय कामठे, शरद पोळ, सत्यजित लोंढे व रियाज शेख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prakash Ambedkar On Lok Sabha Election 2024 | प्रकाश आंबेडकरांकडून नव्या समीकरणाचे संकेत, म्हणाले ”महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरूवात…”

Pune Sadashiv Peth Crime | सदाशिव पेठेतील आणखी एका मंदिरात चोरी, दानपेटीतून रोकड लंपास