Pune Water Crisis | पाण्यासाठी बेजार नागरिक आयुक्तांच्या वक्तव्याने संतापले; ”सध्या पुणेकर निकषापेक्षा जास्त पाणी वापरतात”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Water Crisis | दिवसाला एका व्यक्तीला १५० लिटर पाणी वापरण्यासाठी मिळावे असे गृहीत धरण्यात आले आहे. मात्र पुण्यात प्रतिव्यक्ती दिवसाला २७० लिटर पाणी वापरले जाते. या आधारे पुणेकर हे जास्त पाणी वापरतात, असे वक्तव्य आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी केले आहे. आयुक्तांच्या वक्तव्यानंतर पाण्यासाठी बेजार झालेले पुणेकर भडकले आहेत.(Pune Water Crisis)

पुण्यात सध्या अधुनमधुन पाणी पुरवठा विविध कारणे देऊन खंडित केला जात आहे. तर काही भागात मागील दोन महिन्यांपासून पुणेकरांना पाण्यासाठी रात्री-अपरात्री जागरण करावे लागतेय. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने पाणी भरता भरता उजाडत आहे. तरीही आवश्यक असलेले पाणी मिळत नाही.

पाण्याची टंचाई असल्याने पुण्यात अनेक भागात नागरिक वापरायच्या पाण्यासाठी टँकर मागवत आहेत. पाण्यावरून नागरिकांमध्ये आपसात भांडणे देखील होत आहेत. मात्र, प्रत्यक्ष ग्राउंडवरील ही स्थिती माहित नसल्याने आकडेमोड करत नवे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या वक्तव्याने पुणेकर संतापले आहेत.

पुणेकरांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करताना हडपसरच्या नेहा मुळे यांनी म्हटले की, आयुक्त नवे असल्याने
त्यांना वास्तवाची जाणीव नसावी. त्यांच्या बंगल्यावर मुबलक पाणी येते, त्यामुळे ते कधी पाण्यासाठी रात्री जागे राहिले नाहीत.

जलसंपदा विभागाकडे पाण्याचा वाढीव कोटा मागणार का? असा प्रश्न आयुक्त भोसले यांना विचारला असता
त्यांनी धरणातील पाण्यावर केवळ पुणेकरांचा हक्क नसल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
त्यामुळे पुण्याला मुबलक पाणी मिळणे आता कठिण असल्याचे दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

JM Road Firing Pune | पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न (CCTV Footage Video)

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांच्या रडारवर पुणेकर! एस्कॉर्टच्या नावाखाली तरुणाची फसवणूक