Pune Water Supply News | कालवे सल्लागार समिती बैठक : पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही, खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन 1 मेपासून

पुणे : Pune Water Supply News | यंदाच्या पावसाच्या अंदाज पाहता धरणातील (Pune Dam) पाणीबचत करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात पुढील दिवस पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation (PMC) आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात. तोपर्यंत शहरात पाणीकपात (Water cut In Pune) सुरू करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जाहीर केले. (Pune Water Supply News)

जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठका (kalwa samiti Meeting Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प (Khadakwasla Dam) कालवे सल्लागार समिती बैठकीस खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan), माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatray Bharne), आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), राहूल कुल (MLA Rahul Kul), भिमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), अशोक पवार (MLA Ashok Pawar), संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार (IAS Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh), कृष्णा खोरे विकास महामंडळाचे (Krishna Khore Vikas Mahamandal) कार्यकारी संचालक अतुल कपोले (Atul Kapole), मुख्य अभियंता हणुमंत गुणाले (Chief Engineer Hanumant Gunale), अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप (Superintending Engineer Sunanda Jagtap) आदी उपस्थित होते. (Pune Water Supply News)

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. तसेच शासनपातळीवरुन विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. चाऱ्याचे नियोजन आत्ताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.

पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले असून दर आठवड्याला एक दिवस पाणीकपात
केल्यास हेच पाणी ऑगस्टपर्यंत पुरवता येऊ शकते. तथापि, एक दिवस पाणीकपात केल्यास काही भागात
त्या पाठोपाठचे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होतो असे लोकप्रतिनिधींची तक्रार आहे.
त्यावर महापालिकेने अभ्यास करुन आठ दिवसात तांत्रिक उपाययोजनांचे सादरीकरण करावे.
तोपर्यंत पाणीकपात करण्यात येणार नाही. शेतीसाठीही पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, असेही पाटील म्हणाले.

खडकवासला प्रकल्पांतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन १ मेपासून

खडकवासला प्रकल्पातील ४ धरणात मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे.
त्यानुसार नियोजन करुन नवीन मुठा उजव्या कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी
आवर्तन सोडण्याचे ठरले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.

बैठकीत जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा
उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण
आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

Web Title :-  Pune Water Supply News | Canal Advisory Committee Meeting: Currently there is no water shortage in Pune city, second revision of New Mutha Right Canal under Khadakwasla project from May 1

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 50 हजाराची लाच घेणारा सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Uday Samant | बारसू रिफायनरीसंदर्भात उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर सामंत म्हणाले…

CM Eknath Shinde | महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे