Uday Samant | बारसू रिफायनरीसंदर्भात उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर सामंत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरु आहे. पोलीस बळाचा वापर करुन स्थानिकांचा विरोध मोडून मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरु करण्यात आले. यावेळी 110 आंदोलकांना ताब्यात घेतले असून, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) उमटताना पाहायला मिळत आहे. यावरुन शिंदे-ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बुधवारी (दि.26) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांनी बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती माध्यमांना दिली.

उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, खरंतर ही भेट नाट्य परिषदेसंदर्भात (Natya Parishad) घेतली होती. मात्र, या बैठकीवेळी दोघांमध्ये बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी आणि त्याला सुरु असलेल्या विरोधावर चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे काल काय परिस्थिती निर्माण झाली होती याची माहिती मी शरद पवार यांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंत पुढे म्हणाले, मंगळवारी आंदोलक महिलांना अटक केली होती. मात्र, त्यांना आता सोडून दिलं आहे.
प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलण्यास तयार आहे.
जिल्हा प्रशासनाने तेथील 300 ते 350 लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असे सामंत यांनी यावेळी सांगितले.

मला एक गोष्ट याठिकाणी नमूद करायची आहे की, जसे या रिफायनरीला विरोध करणारे विरोधक आहेत तसेच
समर्थक देखील आहेत. तसेच याठिकाणी सर्वेक्षण (Ratnagiri Refinery Survey) नाही तर केवळ माती परीक्षण
(Soil Testing) सुरु केले आहे. त्यानंतर याठिकाणी प्रकल्प आणायचा की नाही हे कंपनी ठरवणार आहे.
शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करावं. शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यास शासन कटीबद्ध आहे.
यासंदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Web Title :-  Uday Samant | uday samant meets sharad pawar on barsu refinery protest

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : बीपी (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) साठीची 6 प्रकारची औषधे मिळणार मोफत

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद