Pune water Supply | शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गुरुवारी रात्रीच जलकेंद्रातील टाक्या भरणार

बांधकामांसाठी एसटीपीतील पाण्याचा वापर बंधनकारक पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाणी बचतीसाठी उद्यापासून दर गुरुवारी शहरातील पाणी पुरवठा बंद (Pune water Supply) ठेवण्यात येणार असून शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळित (Pune water Supply) राहावा यासाठी महापालिका प्रशासनाने (Pune Municipal Corporation (PMC) नियोजन केले आहे.  यामध्ये प्रामुख्याने एअर व्हॉल्व बसविण्यासोबतच गुरूवारी रात्री दहा वाजताच जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्या भरण्यासोबतच पाईपलाईनमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे (Water Supply Department) अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Superintendent Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

एल निनो वादळाच्या (El Nino Storm) पार्श्‍वभूमीवर पावसाळा (Rainy Season) लांबण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाणी साठ्याचे 15 जुलैपर्यंत नियोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 18 मे पासून दर गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा बंद (Pune water Supply) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू संपुर्ण दिवसभर पाणी पुरवठा बंद (Water supply Shut Off) राहील्यास दुसर्‍या दिवशी पाईपलाईनमध्ये निर्माण होणार्‍या हवेच्या दाबामुळे शहरातील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होतो. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने पाईपलाईनमधील हवा काढण्यासाठी 25 हून अधिक ठिकाणी एअर व्हॉल्व (Air Valve) बसविले आहेत.

पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने केलेल्या अन्य उपाययोजनांची माहिती देताना पावसकर यांनी सांगितले, की यापुर्वी रात्री बारा ते दुसर्‍या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असे 24 तास जलकेंद्रांसह सर्वच यंत्रणा बंद ठेवण्यात येत होती. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यानंतर जलकेंद्र सुरू करून टाक्या भरणे आणि तेथून पुढे पाईपलाईनमध्ये पाणी सोडण्यात येत होते. यावेळी मात्र प्रायोगीक तत्वावर दोन तास अगोदरच जलकेंद्र सुरू करून टाक्या भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून शुक्रवारी कमीतकमी विस्कळीतपणा राहील, असा आमचा प्रयत्न आहे.

यासोबतच शुक्रवारी बाणेर, बालेवाडी, शिवणे, हडपसर, साडेसतरानळी, सुखसागर नगर, भवानी पेठेतील चुडामण तालीम परिसर ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या अधिक तक्रारी असतात, तेथील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची तयारी ठेवण्याचे आदेशही संबधित क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

गुरुवारी टँकरही बंद राहणार

गुरूवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने टँकर भरणा पॉईंटही बंद राहणार आहेत.
त्यामुळे गुरुवारी शहरामध्ये पाईपलाईनसोबतच टँकरने देखील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद राहाणार आहे.
शुक्रवारी पाणी पुरवठा विस्कळीत असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल, असे अनिरुद्ध पावसकर
यांनी सांगितले.

बांधकामासाठी ‘एसटीपी’च्या पाण्याचा वापर बंधनकारक..

पाणी बचतीसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करतानाच महापालिकेने
बांधकामांसाठी शहरातील मैलापाणी प्रक्रिया केंद्रातून अर्थात एसटीपी (STP) मधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा
वापर करणे बंधनकारक करण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या ठेकेदारांसोबतच क्रेडाई आणि मराठी
बांधकाम व्यावसायीक संघटनांशी देखील पत्रव्यवहार करण्यात येत आहे. विकासकांवर महापालिकेच्या आदेशाचे
पालन करणे बंधनकारक असून बांधकामाच्या ठिकाणी एसटीपीतील पाण्याचा वापर होतो की नाही यावर लक्ष
ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

Web Title :  Pune Water Supply | To ensure smooth water supply on Friday, the water center tanks will be filled on Thursday night itself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 2.50 लाख रुपये लाच घेताना वन परिमंडळ अधिकारी व खासगी व्यक्ती अॅन्टी करप्शनच्या ताब्यात

Uddhav Thackeray | ‘तयार रहा, गाफील राहू नका’, उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना आदेश