Pune Water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये (Chikhli Water Treatment Plant) फ्लो मीटर बसवण्याचे, पर्वती ते एसएनडीटी (SNDT) दरम्यानच्या अस्तित्वातील 1 हजार 200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून होणारी गळती रोखणे आणि चतु:श्रृंगी येथील पाण्याच्या टाकीची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याच्या कामामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) गुरुवारी (दि.23) बंद राहणार आहे.

तर शुक्रवारी (दि. 24) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा – औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणारा पाणीपुरवठा – गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती, आळंदी रोड, टिंगरेनगर,
आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगांव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर,
यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड या भागाचा
पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

Web Title :-  Pune Water Supply | Water supply to ‘this’ part of the city will be closed on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई करणाऱ्यांना बांबुने मारहाण; वारजेमधील घटना, दोघे जखमी

Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या

The Dark Shadow Motion Pictures | समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन; विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे असे अनेक दिग्गज लावणार हजेरी