Pune Yerawada Crime | पुणे : शुल्क कारणावरुन फळविक्रेत्याला दगडाने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | लघुशंका करण्यावरुन सुरु असलेले वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका फळविक्रेत्याच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना येरवडा परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.8) रात्री अकराच्या सुमारास मदर तेरेसा हॉलच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक बाथरूम जवळ घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Yerawada Crime )

याबाबत असीफ जिलानी शेख (वय-30 रा. मदर तेरेसा नगर, गाडीतळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रोहन साळवे (रा. डॉनपोल ऑफिस मागे, येरवडा), सक्षम मोरे यांच्यावर आयपीसी 323, 324, 34 सह गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे.
गुरुवारी रात्री फळ विक्रीच्या गाडीजवळ असताना त्यांचा मित्र प्रसाद खडके (वय-27) व रोहन साळवे यांच्यामध्ये
लघुशंका करण्यावरुन वाद सुरु होते. त्यावेळी फिर्यादी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता सक्षम मोरे
याच्यासोबत त्यांचे वाद झाले. त्यानंतर मोरे याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर रोहन याने त्याच्या हातातील दगड फिर्य़ादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wanwadi Crime | पुणे : फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार

पुणे : निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपीला काही दिवसातच जामीन मंजूर

पुणे : रस्त्यालगत लघुशंका केल्याच्या कारणावरुन वार, दोघांना अटक