Pune News : येरवड्यातील कैद्यांचे होणार ‘सिक्स पॅक’, राज्यातील पहिली ओपन जीम सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जेल प्रशासनाने कैद्यांच्या फिटनेसचा विचार करुन येरवडा मध्यवर्ती जेलमध्ये पहिली ओपन जिम (Gym) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कैद्यांच्या फिटनेसवर भर देत तेलंगणा आणि तिहार जेलमध्ये ओपन जिम सुरु करण्यात आली. याच धर्तीवर महाराष्ट्रात कैद्यांसाठीची पहिली ओपन जिम येरवडा मध्यवर्ती जेलमध्ये (Yerawada Central Jail) यंदा सुरु होणार आहे. ओपन जिमला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील इतर मध्यवर्ती जेलमेध्ये ही संकल्पना राबवली जाणार आहे.

तरुंग प्रशानाअंतर्गत राज्यात 9 मध्यवर्ती, 31 जिल्हा, 19 खुली कारगृहे आमि 172 उपतुरूंग आहेत. सध्या यामध्ये 49 हजार 30 हजार 644 कैदी असून शिक्षाधीन असलेल्या कैद्यांना मानसिक नैराश्य येू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मानसोपचार तज्ज्ञांकडून ऑपरेश ट्रकिंगच्या माध्यमातून कैद्यांचे समुपदेश केले जाते. कैद्यांच्या आरोग्य आणि मन:शांतीसाठी त्यांना योग, प्राणायाम याचे धडे दिले जातात. आता जेल प्रशासनाने ओपन जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सायकलिंग, हात आणि पायांचे व्यायामाच्या मशीनने कैद्यांना आपला फिटनेस वाढवता येणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील मुलाखत कक्ष तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आला आहे. कैद्यांना नातेवाईकांना भेटता यावे यासाठी मुलाखत कक्ष सुरु करण्यात आला होता. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे जेलमधील मुलाखत कक्ष पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

येरवड्यात पहिली ओपन जिम होणार आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर मध्यवर्ती कारागृहात ओपन जिम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह व सुधारसेवा, अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सांगितले.