Punit Balan Celebrity League (PBCL) | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा; तोरणा लायन्स्, पन्हाळा जॅग्वॉर्स संघांची विजयाची हॅट्रीक !!

पुणे : Punit Balan Celebrity League (PBCL) | मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, दिग्दर्शक आणि दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या आणि पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ (Punit Balan Celebrity League (PBCL) क्रिकेट स्पर्धेत तोरणा लायन्स् आणि पन्हाळा जॅग्वॉर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदवली.

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्वारगेट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत माधव देवचके याच्या ६० धावा आणि शिखर ठाकरू व संजय जाधव यांच्या गोलंदाजीच्या योगदानाच्या जोरावर तोरणा लायन्स् संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा केवळ १ धावेने सनसनाटी पराभव करून तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करून तोरणा लायन्स् संघाने ९० धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये माधव देवचके याने ६० धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाला उत्तर देताना सिंहगड स्ट्रायकर्स संघाची धावसंख्या ८९ धावांवर मर्यादित राहीली.

कर्णधार जय दुधाणे याच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने तोरणा लायन्स् संघावर ७ धावांनी विजय मिळवून स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पन्हाळा जॅग्वॉर्स संघाने ११४ धावांचे आव्हान उभे केले. जय दुधाणे याने ३२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७७ धावांची खेळी साकार केली. या सामन्यात पुनित बालन यांनी एक फलंदाज बाद करून टी-२० मधील आपला शंभरावा बळी मिळवून अनोखी कामगिरी केली. या धावसंख्येसमोर तोरणा लायन्स् संघाचा डाव १०७ धावांवर मर्यादित राहीला. (Punit Balan Celebrity League (PBCL)

शिखर ठाकूर याच्या ४० धावांच्या जोरावर तोरणा लायन्स् संघाने शिवनेरी रॉयल्स् संघाचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना शिवनेरी रॉयल्स् संघाने ७६ धावांचे आव्हान उभे केले. शिखर ठाकूर (४० धावा) आणि माधव देवचके (२३ धावा) यांच्या धावांच्या मदतीने तोरणा लायन्स् संघाने ७.५ षटकात व ३ गडी गमावून आपले लक्ष्य गाठले.

सागर पाठक याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रागयड पँथर्स संघाने शिवनेरी रॉयल्स् संघाचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. शिवनेरी रॉयल्स् संघाने ९६ धावांचे आव्हान उभे केले.
सागर पाठक याने नाबाद २२ धावा करून रायगड पँथर्स संघाला ९.४ षटकात विजय मिळवून दिला.

विनय राऊल याच्या नाबाद ४३ धावांच्या जोरावर प्रतापगड टायगर्स संघाने सिंहगड स्ट्रायकर्स संघाचा ७ गडी
राखून पराभव करून स्पर्धेत गुणांचे खाते उघडले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
तोरणा लायन्स्ः १० षटकात ३ गडी बाद ९० धावा (माधव देवचके ६० (३६, ४ चौकार, २ षटकार), संजय जाधव १५,
तेजस नेरूरकर २-११) वि.वि. सिंहगड स्ट्रायकर्सः १० षटकात ३ गडी बाद ८९ धावा
(तेजस नेरूरकर ४१ (२३, ८ चौकार), अशोक देसाई नाबाद १७, सिध्दार्थ जाधव १५, संजय जाधव १-१५);
सामनावीरः माधव देवचके;

सिंहगड स्ट्रायकर्सः १० षटकात ५ गडी बाद ८४ धावा (सिध्दार्थ जाधव २४, अशोक देसाई नाबाद ३०,
तेज नेरूरकर २५, हर्षद अतकरी १-६) पराभूत वि. प्रतापगड टायगर्सः ८ षटकात ३ गडी बाद ८८ धावा
(विनय राऊल नाबाद ४३ (२१, ६ चौकार), आदिश वैद्य १६, उत्तुंग ठाकूर १५, अशोक देसाई १-११);
सामनावीरः विनय राऊल;

शिवनेरी रॉयल्स्ः १० षटकात ६ गडी बाद ७६ धावा (आशितोष गोखले ३०, कृणाल पाटील १९,
पुनित बालन २-१५, संजय जाधव २-१४) पराभूत वि. तोरणा लायन्स्ः ७.५ षटकात ३ गडी बाद ७८ धावा
(शिखर ठाकूर ४० (२४, ५ चौकार), माधव देवचके २३, अभिजीत कवठाळकर २-१४, आशितोष गोखले १-२१);
सामनावीरः शिखर ठाकूर;

पन्हाळा जॅग्वॉर्सः १० षटकात ३ गडी बाद ११४ धावा (जय दुधाणे ७७ (३२, ७ चौकार, ४ षटकार),
अमित खेडेकर १४, पुनित बालन १-२२, संजय जाधव १-२८) वि.वि. तोरणा लायन्स्ः १० षटकात ८ गडी बाद १०७
धावा (संजय जाधव २८, शिखर ठाकूर २२, माधव देवचक्के १८, सिद्धांत मुळे २-१६); सामनावीरः जय दुधाणे;

शिवनेरी रॉयल्स्ः १० षटकात ३ बाद ९६ धावा (कृणाल पाटील नाबाद ३७ (२०, ६ चौकार), संदीप जुवाटकर २३,
सागर पाठक १-१०, राया अभ्यंकर १-१४) पराभूत वि. रायगड पँथर्सः ९.४ षटकात ५ गडी बाद १०० धावा
(सागर पाठक नाबाद २२ (१५, २ चौकार, १ षटकार), अजिंक्य जाधव १७, देवेंद्र गायकवाड १४, कृणाल पाटील २-८);
सामनावीरः सागर पाठक;

Web Title :-Punit Balan Celebrity League (PBCL) | 2nd ‘Punit Balan Celebrity League’ Cricket Tournament; Torana Lions, Panhala Jaguars Hattrick of victory !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग

Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…