Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स् संघ उपांत्य फेरीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रंगारी रॉयल्स्, साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.(Punit Balan Group (PBG) – Friendship Cup)

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हरनिश दानी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने महालक्ष्मी मॅव्हरीक्स्चा २२ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रंगारी रॉयल्स्ने ८१ धावांचे आव्हान उभे केले. कैलास व्यास (३४ धावा) आणि सुमित जनापुरे (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानासमोर महालक्ष्मी मॅव्हरीक्स्चा डाव ५९ धावांवर मर्यादित राहीला. हरनिश दानी याने १२ धावात २ गडी बाद केले. प्रथमेश गोवलकर याच्या अष्टपैलु खेळीमुळे साई पॉवर हिटर्स संघाने श्रीराम पथक संघाचा ७ गडी राखून सहज पराभव केला. सामन्यामध्ये प्रथमेश याने ६ धावात २ गडी टिपले आणि १५ धावांचे योगदान दिले.

रोहीत खिलारे भेदक गोलंदाजीमुळे शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने दगडुशेठ वॉरीयर्स संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. रोहीत याने ३ धावात ४ गडी बाद करत चमकदार गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीमुळे दगडुशेठ वॉरीयर्स संघाला पहिल्यांदा खेळताना केवळ ३९ धावा करता आल्या. हे आव्हान शिवमुद्रा ब्लास्टर्सने ५.२ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. भावेश रच्चा याच्या कामगिरीच्या जोरावर गुरूजी तालिम टायटन्स् संघाने नादब्रह्म सर्ववादक संघाचा ७ धावांनी निसटता विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः

रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ३ गडी बाद ८१ धावा (कैलास व्यास ३४, सुमित जनापुरे २६, आदित्य फाटक १-९,
ओंकार पैलवान १-९) वि.वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ८ षटकात ५ गडी बाद ५९ धावा (राहूल भिकुले १०, विवेक जांभुळकर १०, हरनिश दानी २-१२); सामनावीरः हरनिश दानी;

श्रीराम पथकः ८ षटकात ९ गडी बाद ५९ धावा (यशराज परदेशी २५, प्रथमेश गोवलकर २-६, हुमेद खान २-२०)
पराभूत वि. साई पॉवर हिटर्सः ५.५ षटकात ३ गडी बाद ६३ धावा (नागेश अवघडे २५,
प्रथमेश गोवलकर १५, संजय काळोखे १५, अभिजीत कटवाटे २-१२); सामनावीरः प्रथमेश गोवलकर;

दगडुशेठ वॉरीयर्सः ६.४ षटकात १० गडी बाद ३९ धावा (अभिषेक घरमळकर ११, प्रकाश चव्हाण ११,
रोहीत खिलारे ४-३, तुशार आंबट २-५, रूपक तुबाजी २-१३) पराभूत वि. शिवमुद्रा ब्लास्टर्सः ५.२ षटकात २ गडी बाद ४० धावा (आदित्य अष्टपुत्रे १५, तुशार आंबट १५, प्रकाश चव्हाण १-१०); सामनावीरः रोहीत खिलारे;

गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ७ गडी बाद ८१ धावा (राहूल व्यास २०, सुशिल फाले १५,
भावेश रच्चा १८,, रणवीर परदेशी १५, रोहन पवार २-१४) वि.वि. नादब्रह्म सर्ववादकः
८ षटकात ४ गडी बाद ७४ धावा (संकेत कंद ४१, हरीश गोयल नाबाद १३, भावेश रच्चा १-१६, सुशिल फाले १-१७);
सामनावीरः भावेश रच्चा;

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

National Pension System (NPS) | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा