Punjab New CM | पंजाबचे नवे CM चरणजीत सिंह चन्नी; 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

चंदीगड : वृत्तसंस्था –  Punjab New CM | मागील काही महिन्यापासून पंजाबच्या राजकारणात धुसफूस सुरु होती. अखेर पंजाबचे मुख्यंमत्री कॅप्टन अमरींदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर नवनियुक्त मुख्यमंत्री (Punjab New CM) म्हणून काॅग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी आज (सोमवारी) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) आणि ओपी सोनी (OP Soni) यांनी उपमुख्यमंत्री पदाची (Deputy CM) शपथ घेतली आहे. दरम्यान, या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि हरीश रावत उपस्थित होते.

आज पार पडलेल्या शपथविधी कार्यक्रमावेळी 40 जणांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
पंजाबच्या राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी यांना शपथ दिली आहे.
चन्नी आणि त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली आहे.
विशेष म्हणजे 58 वर्षीय चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री पद भूषवणारे पहिले दलित आहेत.
चन्नी (Charanjit Singh Channi) पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून ओपी सोनी यांचं नाव केवळ अर्धा तास आधी पुढं आलं आहे.

 

दरम्यान, चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून ब्रह्म मोहिंद्रा यांची वर्णी लागेल असा दावा केला जात होता.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, आमदारांच्या एकमतानंतर सोनिया गांधी यांनी चन्नी यांच्या नावावर शिकामोर्तब केला.
खरंतर पंजाबमध्ये 34 टक्क्याहून अधिक दलित समुदाय आहे, शिवाय 34 आरक्षित मतदारसंघ देखील आहेत. भाजपने आधीच दलित व्यक्तीच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा केली आहे.
अशात काँग्रेसने चरणजित चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावून विरोधी पक्षांना चांगलाच धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title : Punjab News CM | charanjit singh channa take oath as new cm of panjab with other 2 deputy cm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा’ अशी सुचना त्यांनी केलीय – किरीट सोमय्या

Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील पर्दाफाश करणार – किरीट सोमय्या

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ