10 वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफीसमध्ये 800 जागांसाठी भरती, 10 हजार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली असून यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. पंजाबमधील पोस्ट विभागाने यासाठी अर्ज मागवले असून ग्रामीण पोस्टमन या पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या
८५१ जागांसाठी हि मेगाभरती निघाली असून आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना देखील नोकरीची संधी मिळणार आहे. यामध्ये EWS साठी ५१, OBC साठी १५३, तर SC साठी २१० जागांवर भरती होणार आहे.

अर्ज शुल्क

खुल्या गटातील उमेदवारांसाठी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क असून अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कोणतेही शुल्क नाही.

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०१९

पात्रता
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून १० वी पास असावा. त्याचबरोबर गणित आणि इंग्रजी येणे अनिवार्य आहे.

मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना मासिक १० हजार रुपये मानधन देण्यात येईल.

वय
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त ४० वर्षांचा असावा.

इथे करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी appost.in या वेबसाईटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करावा.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like