शिकाऱ्यांनी बीट गार्डला गोळ्या घालून केलं ‘ठार’, रेंजर आणि पोलिसांनी शोधादरम्यान ‘मृतदेह’ घेतला ताब्यात

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देवास जिल्ह्यातील पुंजापुरा वनपरिक्षेत्रातील बीट गार्डला काल रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गार्ड मदनलाल वर्मा यांचा रक्ताने भिजलेला मृतदेह पुंजापुरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 532 मधील लहान तळ्याजवळ रात्री उशिरा आढळून आला. सहकारी कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, वन संरक्षक काल सकाळी 11 वाजता आपल्या बीटमध्ये भ्रमण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत परत न आल्यामुळे रेंजर व पोलिसांनी शोधाच्या दरम्यान त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सूर्यकांत शर्मा म्हणाले, प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे की जंगलात काही संशयितांना पाहून वन रक्षकाने त्यांना ललकारले, त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर देशी कट्ट्याने फायर केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलीस स्टेशन उदयनगरमध्ये कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणात शिकारी किंवा लाकूड माफियांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.

दुसरीकडे या प्रकरणात वनविभागीय अधिकारी देवास पी एन मिश्रा यांनी म्हटले आहे की, वनविभाग देवास विभागातील पुंजापुरा येथील बीट रतनपूरचे बीट गार्ड मदन लाल वर्मा वनरक्षक, वय 58 वर्षे यांचा संशयास्पद परिस्थितीत दिनांक 4 आणि 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री मृतदेह आढळला. उदय नगर आरोग्य केंद्रात पोस्टमार्टमची कारवाई सुरू आहे.

मृत कर्मचाऱ्याला शहीद चा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोस्टमार्टमनंतर मृताचे अंतिम संस्कार संपूर्ण राजकीय सन्मानासह वन अधिकारी/ कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या गृह नगर उज्जैन येथील रामघाट मध्ये दुपारनंतर होणार आहे. स्वर्गीय कर्मचार्‍यास शासनाचे समस्त देय, विशेष अनुदान 10 लाख आणि कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा नियुक्ती दिली जात आहे.