Pushpa 2: The Rule | ‘पुष्पा 2’ चित्रपटातील व्हिलन फहाद फासिलचा लूक आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Pushpa 2: The Rule | दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) याने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची जबरदस्त कहानी, अल्लू अर्जुनचा हटके लूक, चित्रपट सुपरहिट गाणी व डायलॉग यामुळे ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. प्रेक्षकांना आता पुष्पाच्या सिक्वेलची ‘पुष्पा 2’ ची आतुरता लागली आहे. सध्या ‘पुष्पा 2 द रूल’ या चित्रपटाची (Pushpa 2: The Rule) शुटिंग सध्या चालू असून अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या यामध्येच व्यस्त आहेत. त्याचबरोबर चित्रपटाचा व्हिलन एस.पी. भंवर सिंह शेखावत (SP Bhanwar Singh Shekhawat) हा आता नवीन लूकमध्ये दिसून येणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील व्हिलनची भूमिका साकारणारा अभिनेता फहाद फासिल (Fahadh Faasil Look Out) याचा ‘पुष्पा 2’ चित्रपटातील लूक आऊट करण्यात आला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टर पोस्ट करत ‘पुष्पा 2’ मधील लूक आऊट करण्यात आला आहे.

अभिनेता फहाद फासिल याचा ‘पुष्पा 2 द रूल’ या चित्रपटातील फर्स्ट लूकने सोशल मीडियावर आग लावली आहे. यामध्ये ते वर्दीमध्ये काळा गॉगल लावून सिगारेट फुंकत हटके अंदाज मध्ये दिसून येत आहे. या लूकमध्ये देखील त्यांचे टक्कल असून डोक्यावर भले मोठे निशाण आहे. तसेच त्याच्या गळ्यात ताबीज व कानात बाळी घातलेली दिसून येत आहे. अभिनेते फहाद फासिल यांचा हा जबरदस्त लूक आऊट (Fahadh Faasil Pushpa 2 Look) करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र ‘पुष्पा 2: द रूल’ चे पोस्टर व्हायरल झाले असून प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सर्वांना अक्षरशः वेड लावले होते.
चित्रपटातील पुष्पा आणि श्रीवल्लीची जोडी सर्वांना खूप आवडली.
आता या चित्रपटाचा सिक्वल ‘पुष्पा 2: द रूल’ (Pushpa 2: The Rule) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपटातील लूक रिलीज (Allu Arjun Pushpa 2 Look)
करण्यात आला होता. तो हटके अशा काली माताच्या रुपात दिसत होता. ‘पुष्पा 2’ चित्रपटाची रिलीज डेट (Pushpa 2 Release Date) अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आता अभिनेता फहाद फासिल यांचा लूक आऊट करण्यात आला आहे

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम