Swiss Open 2021 : पी. व्ही. सिंधु फायनलमध्ये पोहचली, कॅरोलिना मारिनशी होऊ शकते लढत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय शटलर पी. व्ही. सिंधुने शनिवारी स्विस ओपनच्या सेमीफायनलमध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेलड्टला मात देऊन फायनलमध्ये स्थान पक्के केले. सिंधु 2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर पहिल्यांदा एखाद्या टूर्नामेंटच्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2019 मध्ये ती वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय बनली होती.

43 मिनिटांपर्यंत चाललेल्या या सामन्यात तिने 22-20, 21-10 ने विजय मिळवला. फायनलमध्ये तिचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मारिन आणि थायलँडची पोर्नपवी चॉचूवाँग यांच्यात खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या सेमीफायनलच्या विजेत्याशी होईल. ब्लिचफेलडटने मागील महिन्यात झालेल्या थायलँड ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये पी. व्ही. सिंधुला मात दिली होती.

पहिल्या राऊंडमध्ये मिळाली जोरदार टक्कर
सिंधुने पहिल्याच राऊंडमध्ये लीड मिळवला होता. तिचा फॉम पाहून वाटत होते की, ती सहजपणे विजय मिळवेल परंतु असे झाले नाही. 17-12 ने पुढे असलेल्या सिंधुला डेनमार्कच्या या खेळाडूने हैराण केले. तिने लागोपाठ पाच गुण मिळवून सिंधुची बरोबरी केली. सिंधुने लीड 20-17 केला. परंतु यानंतर ब्लिचफेलडटने पुन्हा जबरदस्त खेळी केली. तरीसुद्धा सिंधुने तीन वेळा गेम पॉईंट वाचवून विजय मिळवला. दुसर्‍या गेममध्ये ब्लिचफेलडटने अनेक चुका केल्या ज्यामुळे सिंधु पुन्हा लीड मिळवण्यात यशस्वी झाली. सिंधुने ब्रेकपर्यंत 11-6 चा लीड मिळवला आणि पुन्हा येथून तिला संधी दिली नाही.

शुक्रवारी क्वार्टर फायनलमध्ये थायलँडच्या पाचवे स्थान प्राप्त असलेल्या बुसानन ओंगबामरूंगफानला पराभूत केले होते. सिंधुने जवळपास एक तास चाललेला सामना 21-16, 23-21 ने आपल्या नावावर केला.