PWC INDIA | ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ची पुढील 5 वर्षात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक, 10,000 आणखी नोकर्‍या निर्माण करणार; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PWC INDIA | जागतिक सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसी इंडिया (PWC INDIA) ने बुधवारी म्हटले की, ते पुढील पाच वर्षात भारतात 1,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील (PWC Will invest Rs 1,600 crore) तसेच आणखी 10,000 नोकर्‍या निर्माण (PWC will create another 10,000 jobs) करतील.

पीडब्ल्यूसी इंडियाने आपली नवीन व्यवसायिक रणनीती ’द न्यू इक्वेशन’ (The New Equation) ची घोषणा करत म्हटले की, कंपनी या कालावधीत आपल्या कॅम्पस भरतीमध्ये पाचपट वाढ करेल.

कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ’द न्यू इक्वेशन’ ट्रेंडचे विश्लेषण आणि हजारो ग्राहक आणि हितचिंतकांसोबत केलेल्या चर्चेवर आधारित आहे.

पीडब्ल्यूसी इंडियाचे अध्यक्ष संजीव कृष्ण यांनी म्हटले, भारताच्या आर्थिक पायाभूत सुविधा मजबूत आहेत,
देशाचा जनसांख्यिकीय लाभांश आणि नावीन्यपूर्णता वाढविण्यासाठी पर्यावरणीय प्रणाली म्हणून हा एक मोठा फायदा आहे.
आमची नवी रणनिती आम्हाला आणि आमच्या ग्राहकांना देशाचा आर्थिक विकास पुढे नेण्यात,
स्थानिक बाजाराची क्षमता दुप्पट करणे आणि व्यापक प्रकारे समाजासाठी जास्त संधी निर्माण करण्यास सक्षम बनवेल.

यामध्ये म्हटले आहे की, कंपनी पुढील पाच वर्षात भारतात 1,600 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणे आणि 10,000 पेक्षा जास्त अतिरिक्त नोकर्‍या निर्माण करण्याचा प्रयत्न करेल – यापैकी मोठा हिस्सा डिजिटल, क्लाऊड, सायबर, अनालिटिक्स आणि उद्योेन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित असेल.
सध्या कंपनीचे भारतात जवळपास 15,000 कर्मचारी आहेत.

Web Title :- pwc india to invest rs 1600 cr create 10000 more jobs in next five years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारकडून मोठा दिलासा ! आता विना परमिट वापरू शकता इलेक्ट्रिक दुचाकी वाहन

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 6,944 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Unlock | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘देऊळ बंद’च अन् सिनेमागृहाचे दार देखील, राज्य सरकार ठाम