‘या’ राज्यात देशातील पहिले ‘डिजीटल’ गार्डन, झाडांवरील ‘क्यूआर’ कोड स्कॅन केल्यानंतर मिळते संपूर्ण माहिती

तिरुवनंतपुरम : केरळ राज्य सरकारने एक अशी बाग विकसित केली आहे जी पूर्णपणे डिजिटल बाग आहे. या बागेत झाडावर क्यूआर कोड लावले जाणार आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करताच झाडाविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे.

ही बाग केरळच्या राजभवनातील आहे. या बागेला कनककुन्नु नावाने ओळखले जाते. १२ एकरात पसरलेल्या या बागेत १२६ प्रजातीची झाडे आहेत. या झाडांची डिजिटल माहिती जतन केली जाणार आहे.

आतापर्यंत या योजनेच्या प्राथमिक पातळीवर बागेमध्ये असणाऱ्या ६०० झाडांवर क्युआर कोड लावण्यात आले आहेत. बाकी उरलेल्या झाडांवर लवकरच क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्युआर कोड लावण्यात येणार आहे. या कामात केरळ विश्वविद्यालयाचा वनस्पती विज्ञान विभाग मदत करत आहे.

दिल्लीतील लोधी गार्डनमध्ये देखील अशी व्यवस्था
दिल्लीतील लुटीयन्स स्थित प्रसिद्ध लोधी गार्डनमध्ये जवळपास १०० झाडांवर क्यूआर कोड लावण्यात आला आहे. ज्या झाडांवर QR कोड लावण्यात आले आहेत ती झाडे १०० वर्ष जुनी आहेत.

अनेक देशांत झाडांवर QR कोड लावणे अनिवार्य
अमेरिका आणि जपान सारख्या देशात QR कोड लावणे अनिवार्य आहे. यांमुळे झाडांची माहिती मोबाईलवर लगेच उपलब्ध होते. यांमुळे झाडांविषयी जागरूकता निर्माण होण्यास देखील मदत होते.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा