Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat | मंत्री विखेंचा थोरातांना खोचक सल्ला; म्हणाले – ‘पाहुणे म्हणून येता, पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू…’

राहाता : Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat | राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाहुणे म्हणून येता, पाहुण्या सारखे राहा, भाडेकरू बनू नका. तसेच महसूल विभागात काही कठोर निर्णयामुळे अनेकांची चिडचिड वाढलीय, असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला आहे. (Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat)

राहाता शहरात विकास कामांचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळा तसेच शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरण, नागरी सत्कार समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखे पाटील बोलत होते. (Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat)

मंत्री विखे पाटील म्हणाले, स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत, त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या तालुक्यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करू नका. पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनू नका.

विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या सेवा पंधरवड्या निमित्त मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाचे सेवाभावी काम करण्याचे भाग्य मला लाभले. अनेक वर्षे दफनभूमीची मागणी होती. राज्य सरकारने याबाबत मंत्रीमंडळात विना हरकत निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत.

विकासकामांची माहिती देताना ते म्हणाले, शेती महामंडळाच्या जमीनीचा विनीयोग समाजहितासाठी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केल्यामुळे साकुरीच्या पाणी पुरवठा योजनेला जागा देता आली. या जागेवर भव्य औद्योगिक वसाहत प्रकल्प उभा राहील. याबाबत प्रक्रीया सुरू झाली आहे.

तालुक्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी महींद्रा, टाटा आणि अन्य आयटी कंपन्यांसोबत चर्चा झाली आहे. या कंपन्यांनी प्रकल्प उभारणीस सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती विखे यांनी दिली.

विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरीता मोठी उपलब्धी आहे.
या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर होईल.
विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात, केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत.
अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली पण जिल्ह्यासाठी काहीच करता आले नाही.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे म्हणाले, राहाता शहराला देऊन विकासाची प्रक्रिया पुढे नेणारे मंत्री विखे पाटील
हे खरे विकास पुरुष आहेत. नेवासा तालुक्यात पाच वर्षात पाच कोटी मिळाले.
राहाता तालुक्याला एका वर्षांत दहा कोटीचा निधी मिळाला, हे विखे यांच्या कार्यप्रणालीचे द्योतक आहे.

या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ,
साहेबराव निधाने, मौलना रफीक, भाऊसाहेब जेजूरकर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अ‍ॅड रघूनाथ बोठे, प्रा. निकाळे,
प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे उपस्थित होते.

विखेंनी थोरांतावर का सोडले टीकास्त्र?

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील श्रीगणेश कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत
बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी विखेंवर जोरदार टीका केली होती.
विखेंनी राहातामधील कार्यक्रमात राजकीय पाहुणे थोरात आणि विवेक कोल्हेंवर नाव न घेता प्रत्युत्तर देत निशाणा साधला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Deepak Kesarkar | मंत्री केसरकारांचे धक्कादायक विधान, ”कार्यभार स्विकारल्यानंतर २५ कोटींची ऑफर, पण…”