
Maharashtra Minister Deepak Kesarkar | मंत्री केसरकारांचे धक्कादायक विधान, ”कार्यभार स्विकारल्यानंतर २५ कोटींची ऑफर, पण…”
कोल्हापूर : Maharashtra Minister Deepak Kesarkar | मी मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला तेव्हा, काही एजंट माझ्याकडे आले, ते म्हणाले आम्ही तुम्हाला वर्षाला २५ कोटी रुपये देतो. तुम्ही फक्त आम्ही आणलेल्या शाळांनाच परवानगी द्यायची, असे धक्कादायक वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. कोल्हापूर येथे आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Maharashtra Minister Deepak Kesarkar)
दीपक केसरकर म्हणाले की, पण, मी असे केले नाही. परवानग्यांवर आम्ही सह्या करतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम करतो. फाईल आणि गुलाबाचे फुल देतो. असे कोट्यवधी रूपये कुणाला नको असतात असे बिल्कुल नाही. परंतु ही आमची कामाची पद्धत नाही. (Maharashtra Minister Deepak Kesarkar)
केसरकर पुढे म्हणाले, आमची काम करायची पद्धत जनतेसाठी काम करण्याची आहे, नाहीतर ती ऑफर स्वीकारली असती. अॅडमिशनसाठी सुद्धा तशीच ऑफर आली होती. महाराष्ट्राच्या राजधानीत आम्ही काम करतो, मुंबई ही मायानगरी आहे.
लोकांना आवाहन करताना केसरकर म्हणाले, मुंबई ही भारताची कमर्शियल कॅपिटल आहे. म्हणून ते आमच्याशी संबंधित असतात, असे समजू नका. कुठल्याही एजंटला कोणीही बळी पडू नका, त्या एजंटांचे काय करायचे, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुम्ही फक्त आम्हाला नाव द्या. हे लोक असे करतात म्हणून सांगा, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारचे एजंट मंत्रालयाजवळ फिरत असल्याचा आरोप काही
दिवसापूर्वी केला होता. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे.
त्या कंत्राटदार आणि एजंटबरोबर डिलिंग होत आहेत, असे पटोले म्हणाले होते. पटोले यांच्या याच वक्तव्याला केसरकरांनी उत्तर दिले आहे.
राज्य सरकार शासकीय मराठी शाळा बंद करणार असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी प्रसारित झाले होते,
यावर स्पष्टीकरण देताना केसरकर म्हणाले, शासनाकडून शाळांचे सर्वेक्षण सुरू असताना वाड्या, वस्त्या,
दुर्गम भागातील शाळा बंद करणार, अशी आवई उठविणे चुकीचे आहे. एकही शाळा बंद केली जाणार नाही.
उलट इंग्रजी शाळांसारखी सुविधा मराठी शाळांमध्ये निर्माण करून मराठी शाळा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर, पहिली आणि दुसरी ही पाच वर्षे प्री-प्रायमरीमध्ये घेतली जातील.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली