इटालियन ओपन : राफेल नदालने जोकोविचला पराभूत करून पटकावला किताब

नवी दिल्ली : वृत्त संस्था – स्पॅनिश स्टार राफेल नदालने मागील चॅम्पियन नोवाक जोकोविचला तीन सेटच्या सामन्यात 7-5, 1-6, 6-3 ने पराभूत करून विक्रमी 10 व्या वेळी इटालियन ओपन टेनिस टूर्नामेंटचा किताब जिंकला. ही चौथी वेळ आहे जेव्हा त्याने एक टूर्नामेंट दहा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा जिंकली.

त्याने 13 वेळा फ्रेंच ओपन, 12 वेळा बार्सिलोना ओपन आणि 11 वेळा मोंटे कार्लोची ट्रॉफी जिंकली आहे. यासोबतच नदालने 36वी एटीपी मास्टर्स 1000 ट्रॉफी जिंकून जोकोविचच्या सर्वाधिक किताब जिंकण्याच्या विक्रमाशी सुद्धा बरोबरी केली.

दोन्ही खेळाडूंची ही रोममध्ये फायनलमध्ये सहावी आणि एकुण नववी लढत होती. नदालचा हा जोकोविचवर फायनलमध्ये चौथा तर एकुण सहावा विजय आहे. हा दोघांमधील करिअरचा 57वा सामना होता, ज्यापैकी नदालने 28 आणि जोकोविचने 29 जिंकले आहेत.

1990 च्यानंतर सर्वाधिक मास्टर्स किताब जिंकणारे खेळाडू
खेळाडू किताब
जोकोविच 36
नदाल 36
फेडरर 28
आंद्रे अगासी 17
अँडी मरे 14

इगा बनली इटालियन ओपनची नवी सम्राज्ञी
पोलंडची 19 वर्षीय इगा स्वितेक इटालियन ओपनची नवीन सम्राज्ञी बनली आहे. इगान अवघ्या 46 मिनिटात मागील उपविजेता कॅरोलिना प्लिस्कोवा चा 6-0, 6-0 ने पराभव करून पहिल्यांदा डब्ल्यूटीए मास्टर्स 1000 चा किताब जिंकला.