Raghav Juyal | राघव जुयालने सांगितले सलमानच्या ‘बिग बॉस’ची ऑफर दरवर्षी धुडकावण्याचे खरे कारण

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध सेलिब्रिटी असणारा डान्सर राघव जुयाल (Raghav Juyal) याची लोकप्रियता अफाट आहे. आपल्या हटके अंदाजमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या राघवचा मोठा चाहता वर्ग आहे. डान्स आणि सुत्रसंचालनाच्या माध्यामातून त्याने छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याला अनेक शो च्या ऑफर येत असतात. यामध्ये सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या ‘बिग बॉस’ या कॉन्ट्राव्हर्शल शो ची दर वर्षी राघव जुयालला (Raghav Juyal) ऑफर येते. मात्र तो ती का स्वीकारत नाही याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे.

‘डान्स इंडिया डान्स सीजन 3’ (Dance India Dance Season 3′) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राघव जुयाल याने त्याच्या डान्स परफॉर्मसने प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये तो रनरअप ठरला मात्र तेव्हापासून त्याचे करिअर आजतागायत सुरु आहे. ‘डान्स प्लस’ या डान्स रियलिटी शो (Dance Plus Show) मध्ये त्याने होस्ट म्हणून त्याची ओळख निर्माण केली. यामुळे राघवची घराघरांत लोकप्रियता वाढली. यामुळे त्याला लोकप्रिय असलेल्या बिग बॉस हिंदीच्या दर वर्षी ऑफर येऊ लागल्या. सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या या शोमध्ये येणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र संधी मिळूनही राघव जुयालने (Raghav Juyal In Bigg Boss) ती स्वीकारली नाही. यावर मला माझे करिअर खराब करायचे नाही असे उत्तर राघवने दिले आहे.

डान्सर राघव जुयाल म्हणाला की, “मला बिग बॉसमध्ये दरवर्षी बोलावले जाते. मात्र मी नेहमी त्या शोची ऑफर नाकारतो. मी माझ्या करिअरची वाट लावू इच्छित नाही. चित्रपट आणि वेबसिरीजच्या ऑफर येत आहेत. मी होस्टिंग देखील करतोय आणि तसेच मी सध्या चांगली पुस्तकं देखील वाचत आहे. मी पुढे देखील खूप काही करेल. पण बिग बॉस हे काही माझ्यासाठी नाही.” अशा शब्दामध्ये डान्सर राघव जुयाल याने त्याचे बिग बॉसमध्ये न जाण्याचे कारण सांगितले आहे.

डान्सर व मज्जेशीर शैलीमध्ये होस्टींग करणारा होस्ट म्हणून राघव जुयाल (Raghav Juyal) याला नावाजले जाते.
अनेक डान्सिंग शो मध्ये सहभागी झाल्यानंतर त्य़ाने सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली.
आता त्याचा मोर्चा चित्रपट व वेबसिरीजकडे वळाला आहे. राघव हा नुकताच अभिनेता सलमान खानच्या
‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामध्ये झळकला होता.
यामधील त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील करण्यात आले. दरम्यान त्याचे अभिनेत्री शहनाज गील हिच्यासोबतच्या अफेअरच्या (Raghav Juyal And Shehnaz Gill Affair) चर्चांना देखील उधाण आले होते. मात्र राघवने यावर पूर्णविराम लावला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट