Rahul Gandhi Modi Surname Case | ‘गांधी कभी माफी नही मांगते!’ SC च्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Gandhi Modi Surname Case | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आडनावाचा वापर करुन बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं (Gujarat High Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणात राहुल गांधींच्या बाजूने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गुजरात कोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी (MP) मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते (Opposition Leader) आणि काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Congress MLA Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rahul Gandhi Modi Surname Case)

दोष नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं पाप केलं गेलंय. राहुलजी माफी मागणार नाहीत. आधीही मागितली नव्हती. गांधी आहेत ते. गांधी कभी माफी मांगते नहीं. या देशासाठी गांधींनी समर्पण दिलंय, बलिदान दिलंय. या देशासाठी त्यांनी रक्त वाहिलंय, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सत्याचा विजय झाला आहे. आजचा निकाल म्हणजे संविधानाचा (Constitution) विजय आहे. द्वेषाविरोधातील ही मोठी चपराक आहे. राहुल गांधींचा आवाज देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचेल. येणाऱ्या दिवसांत देशातील हुकूमशाहीला नष्ट केलं जाईल. ज्याची नियत प्रामाणिक असेल, ज्यांची मेहनत शुद्ध असते त्याबाबतीत असा निकाल लागतो, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय

आमचे नेते राहुल गांधी यांना खोट्या खटल्यात सुनावलेल्या अन्यायकारक शिक्षेला
आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ कायदेशीर दिलासा नाही तर आपल्या न्यायव्यवस्थेच्या सामर्थ्याचा, सामाजिक न्याय आणि एकात्मतेच्या आदर्शांप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा पुरावा आहे.

खासदारकी रद्द करण्याची शिक्षा झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत राहुल गांधी यांनी अतुट धैर्य दाखवले.
सशक्त आणि सर्वसमावेशक भारतासाठी त्यांची दृष्टी केवळ वक्तृत्व नसून सकारात्मक बदलाची दिशा
असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर (Rahul Gandhi Modi Surname Case)
शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का?
त्यापेक्षा एक दिवसांची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती.
त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?
असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)