युवक काँग्रेसमधून ‘राहुल गांधी पॅटर्न’ संपुष्टात येणार, पुन्हा…

जयपुर : वृत्तसंस्था – मागील एक दशकापासून युवक काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या ‘राहुल गांधी पॅटर्न’ मध्ये त्रुटी आढळल्यानंतर पुन्हा एकदा हायब्रिड पॅटर्न राबवण्यात येणार आहे. मागील बारा वर्षापासून युवक काँग्रेसमध्ये ‘राहुल गांधी पॅटर्न’ अंतर्गत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत होती. या पदाधिकाऱ्यांची निवड निवडणूक घेऊन केली जात होती. मात्र मागील सहा ते सात वर्षात संघटनात्मक निवडणुकांमध्य विलंब होत असल्याने आता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर पॅटर्न लागू करण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.

हायब्रिड पॅटर्न अंतर्गत निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत नियुक्त्या केल्या जाणार आहे. या संदर्भात युवक काँग्रेसचे प्रभारी डॉ. पलक वर्मा यांनी सांगितले की, राजस्थान युवक काँग्रेसमध्ये 400 ब्लॉक अध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे, युवक काँग्रेसमध्ये निवडणुका सुरु झाल्यानंतर ब्लॉक अध्यक्ष पद कार्यकाळात संपुष्टात येईल. त्यामुळे 10 वर्षानंतर पुन्हा ब्लॉक अध्यक्ष नियुक्त होणार आहे.

पुन्हा जुना पॅटर्न लागू केला जाणार

युवक काँग्रेसच्या संघटनेच्या निवडणूक निकालापूर्वीच सुमित भगासरा यांना विजयी झाल्याचे सांगण्यात आले. भगासरा काही दिवस पदावर राहिल्यानंतर निवडणूकीचा निकाल जारी करण्यात आला आणि भगासरा हे विजयी झाल्याचे सांगितले. त्यामुळे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे आता ‘राहुल गांधी पॅटर्न’ हळूहळू संपुष्टात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियुक्तीने झाल्याने आता इतर पदाधिकाऱ्यांची निवडही नियुक्तीद्वारे केली जाणार आहे, ब्लॉकपासून सुरुवात करुन पुन्हा जुना पॅटर्न लागू केला जाणार आहे.