Rahul Narvekar On Sanjay Raut | राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर, ”संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे का, त्यांच्यावर बोलून महत्त्व का द्या?”

मुंबई : Rahul Narvekar On Sanjay Raut | विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून, हे त्यांनी स्पष्ट करावे. चौकीदार चोर आहे, तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. आधीचे राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केलाय की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे, अशी जहाल टीका शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खा. संजय राऊत यांनी केली होती. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर (Rahul Narvekar On Sanjay Raut) दिले आहे.

राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, बिनबुडाचे आरोप ते केवळ निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पडावा आणि आपल्याला हवे तसे घडवून घ्यावे, याच हेतूने करतात. संजय राऊत यांना स्वस्त प्रसिद्धी प्राप्त करण्याची जुनी सवय आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला उत्तर देऊन प्रोत्साहन न देणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. अशा व्यक्तींबद्दल आपण का बोलावे? आणि त्यांना का महत्त्व द्यावे?

नार्वेकर (Rahul Narvekar On Sanjay Raut ) म्हणाले, संजय राऊत म्हणजे, काय सुप्रीम कोर्ट आहेत का? संजय राऊत म्हणजे, काय प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत का? नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष का द्यावे. संजय राऊत यांना विधिमंडळाचे नियम समजत असते, तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांची त्यांना माहिती असती, तर असे वक्तव्य केले नसते. संजय राऊतांसारख्या व्यक्तींच्या प्रश्नाला किंवा आरोपांना उत्तर देऊन मी स्वतःची गरिमा कमी करू इच्छित नाही.

सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपण्णीवर नार्वेकर म्हणाले, सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की, नेमके
नियमबाह्य अथवा घटनाबाह्य काय कृत्य झाले आहे, ते जर समजले नाही, तर पुढची कारवाई कशी काय होऊ शकेल?
त्यामुळे सुनावणीनंतर जास्त स्पष्टता येईल.

नार्वेकर म्हणाले, जे वेळापत्रक बनवले होते, त्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नव्हती.
परंतु, केवळ हेतूपुरस्पर एकूण दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी जर का असे आरोप केले जात असतील,
तर या आरोपांची दखल घेत नाही आणि घ्यायची गरजही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | दिवे घाटात वाहन चालकाला लुटणाऱ्या निलेश बनसुडे व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 69 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA