Raigad Crime News | कर्जबाजारीपणाला कंटाळून शिक्षकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – Raigad Crime News | राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. लोक शुल्लक कारणावरून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात घडली आहे. महाड तालुक्यातील वरंध या ठिकाणी शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने आत्महत्या (Suicide) केली आहे. संतोष ज्ञानेश्वर मेमाणे (रा. वरंध तालुका महाड, मूळ रा. सासवड, जिल्हा पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. (Raigad Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
संतोष ज्ञानेश्वर मेमाणे यांनी वरंध येथील राहत्या घरामध्ये छताच्या फॅनला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. मृत संतोष मेमाणे हे रायगड जिल्हा परिषद शाळा भावे चौधरीवाडी इथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. (Raigad Crime News)

काय लिहिले चिट्ठीमध्ये?
मृत संतोष यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. संतोष यांचा मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. या मृत्यूप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे या ठिकाणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरेगावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : Raigad Crime News | a 33 year old teacher committed suicide due to debt incident at mahad raigad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Pune Crime News | मैत्रिणीने दोघांबरोबर शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा केला प्रयत्न; विनयभंगाचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime News | दुसरे लग्न करण्यास विरोध केल्याने वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; वडिल, आजीविरोधात गुन्हा दाखल

Akola ACB Trap | फेरफारनोंद करुन 7/12 उतारा वेगळा करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी कप्शनच्या जाळ्यात