Raigad Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गरोदर ठेवणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला जन्मठेप

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करुन तिला गरोदर (Pregnant) ठेवणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायालयाचे (Additional Sessions Court) न्यायाधीश शाईदा शेख (Judge Shaida Shaikh) यांनी 27 जुलै रोजी जन्मठेप (Life Imprisonment) आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा (Penalty) सुनावली आहे. रविंद्र महादेव जाधव Ravindra Mahadev Jadhav (वय-50 रा. नवनाथ कॉलनी, खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. (Raigad Crime News) याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात (Khopoli Police Station) आयपीसी 376 (2) (जे) (एन) व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने सप्टेंबर 2013 मध्ये अल्पवयीन पिडीतेच्या घरी ती एकटी असल्याचा फायदा घेवून जबरदस्तीने शरीर संबंध केले तसेच आईवडिलांना अथवा अन्य कोणाला सांगितल्यास, तुझी जीभ तोडून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर सप्टेंबर 2013 ते जून 2014 या कालावधीमध्ये वेळोवेळी पिडीत मुलीच्या घरी कोणी नसताना पिडीत सोबत शरीरसंबंध केले. यातून पीडित मुलगी ही आठ महिन्याची गरोदर राहिली. पीडित मुलीच्या आईने तिची तब्बेत ठीक नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी (Medical Checkup) नेले असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. (Raigad Crime News)

याबाबत आईने मुलीकडे चौकशी केली असता पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. आईने खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीने आरोपी रविंद्र जाधव याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje) यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते..

या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी (Public Prosecutor)
अभियोक्ता अॅड. प्रतिक्षा वडे-वारंगे (Adv. Wait Vade-Warange)
यांनी 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. या प्रकरणात पीडित मुलीची आई,
पीडित मुलगी तसेच वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरुन न्यायाधीश शाईदा शेख यांनी आरोपी महादेव जाधव याला दोशी धरुन जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge),
अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे (Addl SP Atul Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि सध्याचे
सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन.राजे यांनी या गुन्ह्याचा
अंत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केला होता..
या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस शिपाई दिक्षा राठोड, पोलीस शिपाई स्वप्नील पानसरे यांनी सहकार्य केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)