Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळवाडीत सलग दुसऱ्यादिवशी रेस्क्यू ऑपरेशन, मृतांचा आकडा वाढला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात माहिती (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी रात्री इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याची (Raigad Irshalwadi Landslide) घटना घडली. आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र आतापर्यंत दुर्दैवाने 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. त्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत (Assembly) निवेदन दिलं. आजही या परिसरात (Raigad Irshalwadi Landslide) पाऊस सुरु असल्यानं बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहे. परंतु तरीदेखील NDRF च्या जवानांनी बचाव कार्य सुरुच ठेवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये (Raigad Irshalwadi Landslide) गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीला गेल्याने काय काय मदत करता आल्याचे सांगितले. रात्री 11.35 वाजता पाहिली माहिती मिळाली. रात्री 12.40 सुमारास पहिली यंत्रणा पोहोचली होती. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस (Rain) परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण होती.

NDRF -4 टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम (Rescue Team) यांनी मोलाची कामगिरी बजावली.
गिरीश महाजन, दादा भुसे (Dada Bhuse), उदय सामंत (Uday Samant) तात्काळ घटनास्थळी धावले.
3 वाजता गिरीश महाजन (Girish Mahajan) हे प्रत्यक्ष घटना घडली तिथे पोहोचले. आदिती तटकरे (Aditi Tatkare),
अनिल पाटील (Anil Patil) हेही पोहोचले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Raigad Irshalwadi Landslide

मी आलो तर यंत्रणा वेगाने काम करेल, वाटेत मला अमित शहांचा (Amit Shah) फोन आला, त्यांनी केंद्र काय मदत करु शकते का हे विचारले. तसेच लष्कराची दोन मोठी वजन उचलणारी हेलिकॉप्टर तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

60-70 कंटेनर मागविण्यात आले आहेत. त्यापैकी 30 कंटेनर पोहोचले आहेत. त्यात तेथील ग्रामस्थांची राहण्याची सोय करण्यात येत आहे. तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जागा पाहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. सिडकोला (CIDCO) या नागरिकांना वेगाने घरे बांधण्यास सांगितले आहे. सिडको या नागरिकांना घरे बांधून देणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

इर्शाळवाडीवरील प्रसंग दुर्दैवी होता. आपल्याकडे सर्व यंत्रणा असताना आपण वापरू शकलो नाही ही मनामध्ये खंत आहे.
आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरु असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहचली.
नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि
अजित पवार (Ajit Pawar) यांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली.
तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येईल,
असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जवळपास सर्वच लोकांनी सहकार्य केलं. या सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे.
माणुसकी काय असते, शेवटी राजकारण करायच्या वेळा असतात.
विरोधी पक्षाच्या लोकांनीही सहानुभूती दाखवत सरकारला सहकार्य केलेलं आहे, असंही शिंदे म्हणाले.

Pune Congress On Manipur Govt | पुणे : मणीपुर सरकार त्वरित बरखास्त करा – काँग्रेस नेते मोहन जोशी

Bombay High Court On Sudhakar Jadhavar | प्राचार्यपदी मुदतवाढ मागणाऱ्या सुधाकर जाधवर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, जाणून घ्या प्रकरण