पश्चिम रेल्वेत काम करण्याची संधी, ‘या’ पदांवर होतेय भरती, जाणून घ्या पात्रता आणि वयोमर्यादा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रेल्वेत काम करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांना उत्तम संधी चालून आलेली आहे. पश्चिम रेल्वेने ज्युनिअर टेक्निकल असोसिएट्समधील विविध पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची भरती प्रक्रिया जाहिर झाली असून पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे असून, कमाल वयोमर्यादा पदांनुसार 33 ते 38 वर्षे आहे.

पश्चिम रेल्वेने ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या एकूण 41 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांची विभागणी, ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) 19 पदे, ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) 12 पदे, ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (टेलीकम्युनिकेशन/एस अँड टी) 10 पदे अशी विभागणी आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या नोटीफिकेशनुसार पात्र उमेदवार 22 ऑगस्टपर्यंत भरतीसाठी अर्ज करु शकतात.

या पदांसाठी अर्ज करणारा इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे. संबंधित उमेदवाराकडे संबंधित इंजिनियरिंग विभागातील तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा बिेएससी किंवा चार वर्षाची बॅचरल पदवी (बीई/बीटेक) असणे आवश्यक आहे. या पदासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. तर कमाल वयोमर्यादा 33 ते 38 वर्षे एवढी आहे.

पश्चिम रेल्वेमधील या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे भरती संबंधीची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करावे. तसेच नोंदणी संबंधीची माहिती त्यात भरावी. तिथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागेल. दरम्यान उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी तो व्यवस्थित तपासून घ्यावा.