Railway Ticket Booking | जाणून घ्या! भारतीय रेल्वे देते ‘या’ लोकांना 75 टक्क्यांपर्यंत सूट

पोलीसनामा ऑनलाइन – Railway Ticket Booking | आपल्या देशामध्ये लांबच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी आजही रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. दररोज करोडो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. प्रवासांना देखील भारतीय रेल्वे माफक दरात प्रवासी सुविधा पुरवते त्याचबरोबर काही प्रवाशांना आकर्षक सुट देखील देते. भारतीय रेल्वेच्या ऑफरमध्ये काही प्रवाशांना तिकीट बुकिंगमध्ये (Railway Ticket Booking) भरघोस सवलत आहे. यामध्ये आजारी, दिव्यांग, अपंग आणि काही विशेष व्यक्तींचा समावेश आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून मिळणाऱ्या सवलती (Railway Ticket Discount) माहिती असणे आवश्यक आहे.

प्रवाशांना माफक दरात सेवा देणारी भारतीय रेल्वे गंभीरपणे आजारी व्यक्तींना तिकीट दरामध्ये सवलत देते. यामध्ये मानसिक दृष्ट्या विकलांग आणि अंध प्रवाशांना रेल्वे भाड्यामध्ये सवलत आहे. जे लोक इतर व्यक्तींच्या मदतीशिवाय रेल्वे प्रवास करु शकत नाही अशा या सर्व स्पेशल लोकांसाठी ही सवलत लागू आहे. मतिमंद व गतिमंद लोकांसाठी 3AC, स्लीपर, जनरल क्लासमध्ये तिकीट बुकिंगवर 75 टक्क्यांपर्यंत वेगवेगळी सूट दिली जाते. मात्र अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने त्या सुविधेचा वापर लोक घेताना दिसून येत नाहीत.

भारतीय रेल्वेच्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसारख्या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये या लोकांना 1st क्लास AC आणि 2nd क्लास AC मध्ये 50 टक्के सवलत आणि 3AC आणि AC चेअर कारमध्ये 25% पर्यंत सवलत आहे. शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) व राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) या गाड्या लहान प्रवासासाठी डिझाइन केलेल्या असून फास्ट स्पीड आणि वेळ यामुळे ओळखल्या जातात. अशा महत्त्वाच्या ट्रेनमध्ये अपंग व दिव्यांग लोकांसाठी 50 टक्क्यांपर्यंत सूट (Disabled People Ticket Discount) दिली जाते. ज्या व्यक्ती बघण्यासाठी व ऐकण्यासाठी पुर्णपणे सक्षम आहे अशा लोकांसाठी 50 टक्क्यांपर्यंत सुट मिळते. आणि अशा लोकांसोबत प्रवास करणाऱ्या लोकांना देखील तिकीट दरामध्ये सलवत दिली जाते.

अपंग व्यक्तींसोबत (Handicapped People Concessions ) काही गंभीर आजाराने त्रस्त लोकांना
देखील भारतीय रेल्वे तर्फे तिकीट दरामध्ये सवलत दिली जाते.
या सवलतीसाठी काही आजारांची नावे रेल्वे तर्फे जाहीर करण्यात आली आहे.
त्या ठराविक आजाराने ग्रस्त असलेले लोक ही सवलत घेऊ शकतात. या आजारामध्ये कर्करोग (Cancer),
थॅलेसेमिया (Thalassemia), हृदयरोग (Heart Disease), किडनी समस्या (Kidney problems),
हिमोफिलिया (Hemophilia), टीबी (TB), एड्स (Aids) , अशक्तपणा (Weakness)
आणि इतर आजारी व्यक्तींना रेल्वेच्या भाड्यात सवलत मिळते.
या आधी रेल्वेकडून जेष्ठ व्यक्तींना देखील रेल्वेच्या भाड्यामध्ये सवलत मिळत होती. मात्र कोरोनानंतर
सिनियर सिटीझनला मिळणारी सवलत भारतीय रेल्वेकडून बंद करण्यात आली आहे.
सध्या काही आजारांनी ग्रस्त व दिव्यांग व अपंग लोकांना रेल्वे दरांमध्ये (Railway Ticket Booking) सवलत दिली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात