आता रेल्वेत बुक करता येणार ‘टू बीएचके फ्लॅट’

दिल्ली : वृत्तसंस्था-रेल्वे प्रवाशांसाठी आता एक खूषखबर आहे. खूप लोक आहेत ते जनरलमधून प्रवास करतात तर अनेक प्रवासी असेही आहेत जे  सेकंड एसी, थर्ड एसी किंवा अगदी फर्स्ट क्लासमधून प्रवास करतात. प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे की याहीपेक्षा आरामदायक प्रवास करणं त्यांना शक्य होणार आहे. सलून नावाची नवी संकल्पना आली आहे. सलून म्हणजे एक टू बीएचके फ्लॅटच असणार आहे.  म्हणजे प्रवासी आता चक्क टू बीएचके फ्लॅटच रेल्वेत बुक करू शकणार आहेत.

ज्यामध्ये ड्रॉईंग रुम, टॉयलेट, बाथरुम आणि दोन बेडरुम असणार आहेत.  रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आत्तापर्यंत फक्त प्रथम श्रेणी अधिकारी आणि त्यावरील अधिकारी, मंत्री यांच्यासाठी असणारी ही सुविधा सर्वांसाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय म्हणजे एक सुखद धक्का आहे.

सामान्य माणसालाही आता उत्तम सेवा-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेचीही तशी अपेक्षा आहे. त्याचमुळे सलून्स अर्थात रेल्वेतले असे आरक्षित कोचेस सर्वांसाठी खुले करण्याचे आदेश पियुष गोयल यांनी दिले आहेत. ज्या प्रवाशांना हे लक्झरी सलून्स हवे आहेत त्यांना त्याचे शुल्क अदा करावे लागणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आयआरसीटीसीला या संदर्भातले निर्देश दिले आहेत. सध्या रेल्वेकडे ३३६ सलून कार्स आहे. ज्यापैकी ६२ एअर कंडिशन आहेत.

सर्वांनाच आता एका लक्झरी सेवेचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खरंच ही एक आनंदाचीच बाब आहे. पूर्वी ही सुविधा फक्त प्रथम श्रेणी अधिकारी आणि त्यावरील अधिकारी, मंत्री यांच्यासाठी होती. परंतु याचा लाभ आता सर्वांनाच घेता येणार आहे. याचे शुल्क अदा करण्यासाठी समर्थ असणारा प्रत्येक व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊ शकतो. अधिकाधिक सेवा-सुविधा यात मिळत असल्याने प्रवास अधिकच आरामदायक होणार आहे. खरंचच प्रवाशांची हॅप्पी जर्नी होणार आहे.