शंभर वर्षात झाला नाही एवढा केरळमध्ये पाऊस

त्रिवेंद्रम : वृत्तसंस्था

गेल्या शंभर वर्षात झाला नाही एवढा मुसळधार पाऊस केरळमध्ये झालेला नाही, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी दिली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d235bf7-a22d-11e8-b7ff-0301cbe23270′]

या पावसाने केरळ राज्यात अनेक गांवे आणि शहरांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यात दीड हजाराहून अधिक मदत छावण्या उभ्या केल्या असून त्यात सव्वा दोन लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. पुरात ४५० हून अधिक माणसे मृत्यूमुखी पडली असून असंख्य जनावरे दगावली आहेत. राज्यातील ८० धरणांचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी उघडावे लागले आहेत. यातून पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. केरळमधील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. देशवासीयांनी केरळला सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सर्व भारतीयांनी केरळच्या मदतीला धावून जावे, असे आवाहन अभिनेता जॉन अब्राहम याने केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मदत पाठवावी असे आवाहन केले आहे.