Rain in Pune | पुण्यात पावसाच्या सरी, अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सगळीकडे होळी (Holi) सण उत्साहात साजरा होत असताना पुण्यात पावसाच्या (Rain in Pune) मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली. कोथरुड, डेक्कन, नारायण पेठ, विश्रांतवाडी, लोहगाव या भागात पाऊस पडला.  हवामान खात्याने (Meteorological Department) पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह आसपासच्या भागात पावसाच्या (Rain in Pune) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार रविवारी सायंकाळी पाऊस पडला.

 

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे पुणेकरांची (Rain in Pune) चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील काही भागात पावसामुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याने कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

 

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. धुळे जिल्ह्यात प्रचंड गारपीट (Hailstorm in Dhule) झाली आहे. गारपिटीनंतर काश्मीरसारखी सर्वत्र बर्फाची चादर पसलेली पहायला मिळाली. एक तास झालेल्या गारपीटीमुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगोदरच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच आस्मानी संकट आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

बऱ्याच ठिकाणी तुरळक हलक्या स्वरुपातील सरी कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात 6 व 7 मार्च रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
सध्या पुण्यात सकाळी व सायंकाळनंतर किमान तापमान कमी असल्याने गारवा जाणवत आहे.

Web Title :- Rain in Pune | Rain showers in Pune, Pune residents panic due to sudden rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होळी (व्हिडिओ)

PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

Kolhapur Crime News | अनैतिक संबंधाच्या वादातून तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून खून, कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना