PMPML Strike | पीएमपीएमएलचा संप त्वरित मिटवा, आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप (PMPML Strike) पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापी खपवून घेतले जाणार नाही. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया (Omprakash Bakoria) यांची भेट (PMPML Strike) घेऊन केली. यावेळी काँग्रेसचे सचिव मोहन जोशी (Congress Secretary Mohan Joshi) हे देखील उपस्थित होते.

सध्या दहावीच्या परीक्षा (SSC Exam) सुरु झाल्या आहेत. या संपामुळे (PMPML Strike) सर्वसामान्य पुणेकरांनाही अतोनात त्रास होत आहे. त्यामुळेच कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारणाऱ्या या ठेकेदारांवर (Contractors) त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करावी. अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. तसेच या ठेकेदारांच्या थकीत बिलासंदर्भात संबंधितांशी तातडीने चर्चा करून प्रश्न मिटवावा, असेही धंगेकर यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्यशासन यांच्याशी यासंदर्भात तातडीने चर्चा करून हा प्रश्न मिटविण्याचे प्रयत्न करत असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी यावेळी सांगितले.

पुण्यातील ओलेक्ट्रा (Olectra), हंसा (Hansa), अँथोनी (Anthony), ट्रॅव्हल टाईम (Travel Time) या
चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. मागील तीन महिन्यांची बिले थकल्यामुळे ठेकेदारांनी संप पुकारला आहे.
ठेकेदारांच्या संपाचा फटका विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.
संपामुळे जवळपास 1100 बसेस धावणार नसल्यामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title :- PMPML Strike | MLA Ravindra Dhangekar demands that PMPML’s strike should be ended immediately

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी