शिवाजी पार्कसाठी सरसावले राज ठाकरे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील दिले तब्बल 1.25 कोटी !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   शिवाजी पार्क मैदानाच्या नुतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिका 4 कोटी रुपये खर्च करणार आहे. परंतु सोबतच आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही शिवाजी पार्क भोवती ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंच्या वॉकसाठीच्या फुटपाथचं सुशोभीकरण आणि रोषणाईसाठी 1.25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदार निधीतून केला जाणारा हा पहिलाच प्रोजेक्ट ठरणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कभोवती (शिवार्जी पार्क) असलेल्या फुटपाथचा अनेक ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू दैनंदिन पातळीवर वापर करत असतात. परंतु संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी व्यवस्थित रोषणाई नसते. त्यामुळं माझ्या आमदार निधीतून 1.25 कोटींचा निधी या कामासाठी वापरण्यात यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याचं मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितलं आहे.

खास बात अशी की, शिवाजी पार्कच्या नुतकरणाच्या प्रकल्पासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही महापालिका आयुक्तांना कॉर्पोरेट फंड जमा करण्यासाठीचं पत्र लिहिलं होतं. राज ठाकरेंनी पत्र लिहिल्याच्या काही आठवड्यातच आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आफल्या निधीचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेली निधी वापराची विनंती विशेष बाब म्हणून तात्काळ मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.