Raj Thackeray | अभद्र बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच खडसावले; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या राजकारणात (Maharshtra Politics) मागील काही दिवसांपासून अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर एकमेकांवर टीका करताना राजकीय नेते करत आहेत. यावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अशा भाषा वापरत बोलणाऱ्या राजकीय नेत्यांना कठोर शब्दात सुनावले आहे. तसेच अशा लोकांना वृत्तवाहिन्यांनी देखील स्थान देऊ नये. असे आवाहन एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

एका वृत्तवाहिनीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘मागील दहा वर्षात अनेक मुख्यमंत्री झाले. बऱ्याच लोकांचे सरकार आले, गेले. मागील दहा वर्षातील व्हिजनचे काय झाले? हे मला विचारायचे आहे. आत्ता जे सत्तेत आहेत किंवा होते त्यांनी ते समोर आणा. मी त्यांना प्रश्न विचारतो. महाराष्ट्राचा बकालपणा आणि चिखल झालेला आहे. सध्या राजकारणात बोलली जाणारी भाषा योग्य नाही. तसेच जर सर्व वृत्तवाहिन्यांनी अशा भाषेत बोलणाऱ्यांवर बंदी घातली. तर त्यांची परत अशी बोलण्याची हिंमत होणार नाही.’ असे स्पष्ट मत यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

मी (Raj Thackeray) राजकारणात येण्याअगोदर व्यंगचित्रकार होतो. पण जेव्हापासून मी राजकारणात आलोय, तेव्हापासून आपण त्याच त्याच समस्यावर बोलत आहोत. रस्त्याचा, पाण्याचा, शाळेचा प्रश्न सोडवू असे सुरूवातीपासूनच आश्वासन दिले जाते. मग अजूनही तेच प्रश्न कसे काय आहेत. असा सवाल देखील यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

आपल्याला आपल्याच गरजा समजल्या नसून आपण फक्त बेसुमार खर्च करत सुटलोय.
आपल्याला फक्त विकास दाखवायचा आहे. पूल बांधणे, मेट्रो आणणे याने प्रश्न सुटणार नाहीत.
सध्या ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर आहे. मग वाहनांवर बंदी कधी येणार? पुण्या-मुंबईसारख्या शहरात अग्निशामक
दलाचा बंब देखील जाऊ शकत नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा. ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढत आहे.
गाड्या विकत आहेत. पण त्या पार्क कुठे होत आहेत, याची आपल्याला माहिती नाही.
एका शहराची चार शहरे झाली आहेत. कोण कोठे राहतोय हे देखील समजत नाही. असे देखील यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले.

राज्य कसे उभे राहिले पाहिजे, पाण्याचा प्रश्न कसा सुटला पाहिजे, रोजगार, शाळा यांचे प्रश्न कसे सुटले
पाहिजेत यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा माणूस बोलवा. असे देखील राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

Web Title :-Raj Thackeray | raj thackeray demands ban on broadcasting politicians who use abusive language

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोटजातीत लग्न केल्याने श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीने टाकले वाळीत, बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार

Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’