Raj Thackeray | राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर प्रशासनाला आली जाग; अखेर सांगलीतील ‘ते’ अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली. यानंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी नव्या रचनेच्या माध्यमातून सदर जागेची मोजणी केली. यानंतर सांगली महापालिका आयुक्त सुनील पवार (Sangli Municipal Commissioner Sunil Pawar) यांनी सदर जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले. सध्या त्या ठिकाणी सांगली महापालिका शाळेचं आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर क्षेत्रावर हे आरक्षण आहे. त्यामुळे या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी सांगलीच्या जुना कुपवाड रोडवरील मंगलमुर्ती कॉलनी (Mangalmurthy Colony on Old Kupwad Road) या ठिकाणी बेकायदेशीररित्या मशिद बांधण्यात येत असल्याचा मुद्दा आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला होता. यानंतर मोठी खळबळ उडाली. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे सांगलीच्या जुना कुपवाड रोडवरील मंगलमुर्ती कॉलनीजवळ आज सकाळी हिंदू समाजातील नेत्यांबरोबर मुस्लिम समाजातील नेते देखील उपस्थित होते. यानंतर सांगली महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी दाखल होऊन सदर जागेची मोजणी केली. या ठिकाणी काही अनर्थ घडू नये म्हणून सांगली पोलीस दलाकडून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाबाबत सांगली महानगरपालिका काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले होते.
यानंतर सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली.
सदरच्या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचं आरक्षण आहे. सुमारे सव्वा एकर जागेवर हे आरक्षण असून या ठिकाणी ज्या जागेवर बांधकाम करण्यात आलेलं आहे. त्या जागेवर असणारे बांधकाम अनाधिकृत आहे. त्यामुळे ते तात्काळ पाडण्यात येईल, असे सांगली महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी मशिदीसाठी उभे करण्यात आलेले पत्र्याचे शेड किंवा इतर बांधकाम हे कोणत्याही क्षणी पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच सांगली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील (Smriti Patil, Deputy Commissioner of Sangli Municipal Corporation) यादेखील घटनास्थळी अतिक्रमण विरोधी पथकासह दाखल झाल्या आहेत.

Web Title :- Raj Thackeray | unauthorized construction in sangli likely to be demolished after raj thackerays allegations

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले