तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

ADV

अलवर : वृत्तसंस्था – राजस्थानातील अलवर जिल्ह्यामधील खेरली पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरी हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून एक महिला खेरली पोलीस ठाण्यात आली होती. तेथील पोलीस उपनिरीक्षकाने तिची तक्रार नोंदवून घेण्याचा बहाणा करीत तिच्यावर सतत तीन दिवस बलात्कार केला. हा प्रकार आता उघडकीस आला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. जयपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक हवसिंग घुमारिया यांनी सांगितले की, बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.